शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज विभागात युगपुरुष शिवरायांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

गडहिंग्लज विभागात युगपुरुष शिवरायांना अभिवादन गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ जयंती ...

गडहिंग्लज विभागात युगपुरुष शिवरायांना अभिवादन

गडहिंग्लज :

गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ जयंती विविध शाळा-महाविद्यालये, तरुण मंडळे आणि गावोगावी विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. --------------------------

* मराठा मंडळ, गडहिंग्लज

येथील मराठा मंडळातर्फे येथील दसरा चौकात डॉ. वसंतराव पेडणेकर यांच्याहस्ते प्रतिमेस दुग्धाभिषेक, तर ज्येष्ठ विधिज्ञ अर्जुन रेडेकर यांच्याहस्ते महापूजा झाली. कौसर मुल्लाणी, रामदास कुराडे, जगदीश पाटील, प्रशांत शिंदे यांच्याहस्ते पूजा झाली.

याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष शिवाजीराव भुकेले यांनी स्वागत केले. रामचंद्र शिवणे, अप्पा शिवणे, डॉ. किरण खोराटे, स्नेहा भुकेले, अलका भोईटे, सविता पेडणेकर यांनी विविध ठिकाणांहून आलेल्या शिवज्योतीचे स्वागत केले.

यावेळी दिलीप माने, दिग्विजय कुराडे, राजेंद्र मांडेकर, वसंतराव यमगेकर, राजेंद्र भुईंबर, विद्याधर गुरबे, किरण डोमणे, सतीश पाटोळे, प्रकाश तेलवेकर, सुर्वणलता गोविलकर, श्रद्धा शिंत्रे, सुनीता नाईक, माधुरी शिंदे, कल्याणी खोराटे, स्वाती चौगुले, छाया इंगळे , वसुंधरा सावंत, सविता चव्हाण आदी उपस्थित होते.

--------------------------

* मानवता हेच शिवरायांचे अधिष्ठान

गडहिंग्लज : अद्वितीय बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, संघटन कौशल्य, गनिमी कावा आणि शक्ती व युक्तीच्या जोरावर शत्रूंना सळो की पळो करणारे छ. शिवाजी महाराज यांचे राज्य हे खरे मानवता हेच होते. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रा. डी. जी. कापुरे यांनी केले.

शहरातील शिवराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संस्था सचिव प्रा. अनिल कुराडे यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, एस. डी. सावंत, तानाजी चौगुले आदी उपस्थित होते.

---------------------------

शहरातील चैतन्य अपंगमती विकास विद्यालयात एस. आर. कांबळे व अरविंद बारदेस्कर यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले.

आम्ही गडहिंग्लजकर मंडळातर्फे शहरातील दसरा चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास रामदास कुराडे व महेश आरभावी यांनी पुष्पहार अर्पण केला.

शहरातील किलबिल विद्यामंदिरात मुख्याध्यापक आनंदा घोलराखे यांनी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

येथील क्रिएटिव्ह हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक दिनकर रायकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले.

येथील कला महाविद्यालयात संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. हसूरचंपू येथील वाय. जी. हायस्कूलमध्ये ज्येष्ठ शिक्षक टी. एस. सुतार यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. पूर्वा दुंडगे हिने मनोगत व्यक्त केले.

--------------------------

* डॉ. घाळी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले. प्राचार्य पाटील म्हणाले, अनेक वेगवेगळ्या महाविद्यालयांत मॅनेजमेंट गुरू शिवाजी हा अभ्यासक्रम आता सुरू झाला आहे.

प्रा. शिवाजीराव भुकेले यांनी छ. शिवरायांचे युद्ध कौशल्य, सागरी कौशल्य, संस्कार व आजच्या युवकांनी त्यांच्या चरित्राचे करावे लागणारे आचरण यावर मार्गदर्शन केले.

यावेळी उपप्राचार्य अनिल उंदरे, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापिका व कर्मचारी उपस्थित होते. सरला आरबोळे यांनी आभार मानले.

--------------------------

* ‘संत गजानन’मध्ये शिवजयंती उत्साहात

महागाव : येथील संत गजानन आयुर्वेद महाविद्यालयात संस्थेचे विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण व प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवपुतळ्याचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोवाडे सादर केले.

---------------------------

* महागावमध्ये मिरवणूक व सत्कार

महागाव : येथे स्वराज्य तरुण मंडळातर्फे सामानगडावरून शिवज्योत आणण्यात आली. सजविलेल्या पालखीतून शिवरायांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सरपंच ज्योत्स्ना पताडे, संत गजानन शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. आण्णासाहेब चव्हाण यांच्याहस्ते कोरोना योद्धयांचा सत्कार झाला.

---------------------------

* पेरणोली शिवजयंती उत्साहात

पेरणोली : पेरणोली (ता. आजरा) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा सावंत यांच्याहस्ते प्रतिमा पूजन झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्नेहा क्षीरसागर होत्या. प्रेम लोखंडे, समीर वरेकर, मैथिली जोशिलकर, अपूर्वा सावंत, समृद्धी शिवणे, रुपाली गडकर, सई देसाई यांच्यासह अध्यापिका सुप्रिया पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

------------------------

* कोवाड केंद्रांतर्गत शिवजयंती उत्साहात

चंदगड : कोवाड (ता. चंदगड) येथील केंद्र शाळेत मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्या हस्ते, तेऊरवाडी शाळेत मुख्याध्यापिका प्रेमिला बामणे, चिंचणेत प्रकाश नांदुडकर, मलतवाडीत सुधीर मुतकेकर, निट्टूर शाळेत कविता पाटील, घुलेवाडी शाळेत नारायण पाटील, किणी शाळेत ए. के. पाटील, श्रीराम विद्यालय कोवाडमध्ये मुख्याध्यापक वाय. व्ही. कांबळे, जयप्रकाश विद्यालय किणी येथे पी. जे. मोहनगेकर, दुंडगे शाळेत सुवर्णा आंबेवाडकर, जकनहट्टी शाळेत मुख्याध्यापक श्रीकांत पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन झाले.

---------------------------

* उत्तूरला शिवजयंती उत्साहात

उत्तूर : येथे छ. युवा ग्रुप, ग्रामपंचायत, शाळा, विविध सहकारी संस्थांमध्ये शिवजंयती उत्साहात साजरी झाली. ग्रामपंचायतीतर्फे सरपंच वैशाली आपटे, उपसरपंच सचिन उत्तूरकर, जि. प. सदस्य उमेश आपटे, संजय उत्तूरकर, महेश करंबळी यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाले.

दिलावर लाटवाले, गोपी देसाई यांच्याहस्ते अभिषेक घालण्यात आला. सरपंच आपटे यांच्याहस्ते शिवजन्म सोहळा झाला.

यावेळी छ. युवा ग्रुपतर्फे पशुसंवर्धन शिबिरात उत्तूर व परिसरातील जनावरांना व श्वानांच्या आरोग्याची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. रांगोळी स्पर्धेत विनायक शिंदे (माद्याळ), तेजस्विनी शिंदे (गडहिंग्लज), अर्चना आमणगी (उत्तूर) यांनी यश मिळविले.

---------------------------

* फोटो ओळी : १) गडहिंग्लज येथील दसरा चौकात मराठा मंडळातर्फे छ. शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी मराठा मंडळाचे कार्यकर्ते.

क्रमांक : १९०२२०२१-गड-०६

--------------------------- २) महागाव (ता. गडहिंग्लज) येथील स्वराज्य तरुण मंडळाने उभा केलेला गडाच्या प्रवेशद्वाराचा सेट. दुसऱ्या छायाचित्रात पालखीतून शिवरायांच्या प्रतिमेची काढलेली मिरवणूक.

क्रमांक : १९०२२०२१-गड-०४/०५

--------------------------- ३) उत्तूर (ता. आजरा) येथे ग्रामपंचायतीतर्फे छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य उमेश आपटे, सरपंच वैशाली आपटे, उपसरपंच सचिन उतूरकर आदी उपस्थित होते.

क्रमांक : १९०२२०२१-गड-०३