शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हल्ला तपासात सरकार अपयशी

By admin | Updated: February 19, 2015 23:49 IST

अजित पवार : कायदा, सुव्यवस्थेबाबत सरकारला धारेवर धरणार

कोल्हापूर : चार दिवस झाले तरी अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला करणारे हल्लेखोर अथवा त्यांच्याबाबतचे ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत. त्याबाबत राज्य सरकार, पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे केली. सरकार आता नवे राहिलेले नाही. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत येत्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला धारेवर धरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.पवार यांनी अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलला भेट देऊन ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, सरकार कोणाचेही असू दे; पण राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. आपले विचार ठामपणे मांडणाऱ्या अ‍ॅड. पानसरे यांच्यावरील हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर हल्ला आहे. नरेंद्र दाभोलकर व पानसरे यांच्यावरील हल्ल्यांत साम्य असल्याचे सध्या तरी दिसते. केंद्र आणि राज्यात जो सत्ताबदल झाला, त्यानंतर हिंदुत्ववादी या नावाखाली काही गोष्टी होत आहेत. त्याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. या भ्याड हल्ल्यामागे जात्यंध शक्ती आहे का? हे पाहणे आवश्यक आहे.नागपूर, कोल्हापूर आणि लोणावळ्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राज्यात सर्वसामान्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे. त्यासाठी येत्या अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरणार आहे. (प्रतिनिधी)