Kolhapur: अंबाबाईला ३० लाखांचा सोन्याचा साज, तोडे अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 11:45 IST2024-09-07T11:44:18+5:302024-09-07T11:45:54+5:30

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला शुक्रवारी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व विजयादेवी राणे यांच्यावतीने १७ तोळे. ५४ ...

Goa's Health Minister Vishwajit Rane offered Ambabai a gold ornament worth 30 lakhs | Kolhapur: अंबाबाईला ३० लाखांचा सोन्याचा साज, तोडे अर्पण

Kolhapur: अंबाबाईला ३० लाखांचा सोन्याचा साज, तोडे अर्पण

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला शुक्रवारी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे व विजयादेवी राणे यांच्यावतीने १७ तोळे. ५४ ग्रॅमचा सोन्याचा दोन पदरी साज व ५९० ग्रॅमचे सोन्याचे तोडे अर्पण करण्यात आले. राणे यांचे चिरंजीव गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे हे दागिने सुपूर्द केले.

यातील साेन्याच्या साजची किंमत १३ लाख ७६ हजार ७५० इतकी, तर सोन्याच्या तोड्याची किंमत १६ लाख ३४ हजार २६ इतकी आहे. या दोन्ही दागिन्यांचे एकत्रित मूल्य ३० लाख ११ हजार ०१७ इतके आहे. या आठवड्याभरात दुसऱ्यांदा अंबाबाईला सोन्याचे अलंकार अर्पण करण्यात आले आहेत. याआधी अकोल्याच्या एका भाविकाने ५६ लाखांचा सोन्याचा सिंह अर्पण केला होता. यावेळी मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.

Web Title: Goa's Health Minister Vishwajit Rane offered Ambabai a gold ornament worth 30 lakhs