शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील चार, कर्नाटकातील तीन गावे बाधित!

By admin | Updated: November 28, 2014 00:14 IST

दूषित पाण्याचा पुरवठा : सुमारे दहा हजार लोकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न

राम मगदूम - गडहिंग्लज -हिरण्यकेशी नदीच्या पाण्यात मळीमिश्रीत सांडपाणी मिसळल्यामुळे नांगनूरसह अरळगुंडी, कडलगे व इदरगुच्ची ही महाराष्ट्रातील चार, तर गोटुर, हेब्बाळ व चिकालगुड्ड ही कर्नाटकातील तीन खेडी बाधित होत असल्यामुळे सीमाभागातील सुमारे दहा हजार लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.सात वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्यामुळे नांगनूर ग्रामस्थांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर देवणे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात जाऊन समक्ष तक्रार दिली.त्यानुसार उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर, क्षेत्र अधिकारी वर्षा कदम, राजेश औटी व जयदीप कुंभार यांनी जिल्हाप्रमुख देवणे यांच्यासह गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, उपसरपंच अशोक जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब मोकाशी आणि शिवसेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांसह मळीमिश्रीत सांडपाणी येणाऱ्या ओढ्याची व हिरण्यकेशी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. प्रदूषित पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. या प्रदूषित पाण्यामुळे मोठ्याप्रमाणात नदीतील मासे मृत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच ग्रामस्थांमध्ये आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत.‘नांगनूर’च्या पाण्याचा प्रश्नसंकेश्वर येथील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याकडून येणाऱ्या आणि नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीत मिसळणाऱ्या पाटीलकोडी नावाच्या ओढ्यातील मळीमिश्रीत सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी. शेजारी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, उपसरपंच अशोक जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.