शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेने दिला महापुराचा 'इशारा', कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद; राधानगरी धरण ९० टक्के भरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 14:42 IST

७९ बंधारे पाण्याखाली; ३८ मार्गांवरील वाहतूक ठप्प

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल, साेमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेने इशारा पातळी (४१.२ फूट) ओलांडली. तब्बल ७९ बंधारे आणि ३८ मार्गांवर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धरणक्षेत्रात अद्याप पाऊस सुरू आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर केर्ली गावाजवळ पुराचे पाणी आल्याने महामार्ग बंद करण्यात आला आहे.राधानगरी धरण ९० टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद १५०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात ‘वारणा’ धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ हाेत असून, पाणी सांडव्यापर्यंत पोहोचल्याने ‘वारणा’ नदीतील विसर्गही वाढल्याने पाऊस जरी कमी झाला असला तरी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.रविवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अधूनमधून जाेरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रात मात्र अद्याप पाऊस आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होत असून, राधानगरी ९० टक्के तर वारणा ८० टक्के भरले आहे.आठवड्यानंतर सूर्यनारायणाचे दर्शनगेली आठ दिवस एकसारखा पाऊस असल्याने ऊन पडलेच नव्हते. सोमवारी पावसाने उसंत घेतल्याने दुपारी सूर्यनारायणाने दर्शन दिले.एस.टी.चे सोळा मार्ग बंदमहापुराचे पाणी रस्त्यावर आल्याने एस.टी.चे सोळा मार्ग बंद राहिले आहेत. यामध्ये कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते रत्नागरी या मार्गांचा समावेश आहे.

असे आहेत मार्ग बंद..राज्य मार्ग - ८प्रमुख जिल्हा मार्ग - १६ग्रामीण मार्ग - १४

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसDamधरणriverनदीfloodपूर