शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

भडगावजवळ पाच लाखांचा नरक्या पकडला

By admin | Updated: January 12, 2015 00:37 IST

दोघांना अटक : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

मुरगूड : भुदरगड तालुक्यातील जंगलातील औषधी वनस्पती नरक्या कोल्हापूर येथे विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी भडगाव (ता. कागल) येथे शिताफीने पकडले. त्यांच्याकडून हौदाच्या टेम्पोसह नरक्याची दहा पोती पोलिसांनी जप्त केली. बाजारभावाप्रमाणे या नरक्याची अंदाजे किंमत पाच लाखांच्या घरात असून, अटक केलेल्या भीमराव महिपती कांबळे (वय ४५) व चालक धनाजी भाऊ झाटे (३८, दोघेही रा. काड्याचा हुडा, ता. भुदरगड) यांच्याकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : आज, रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास मुरगूड-कागल रस्त्यावर सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, स.पो.नि. चंद्रकांत मस्के, पोलीस उपनिरीक्षक रमेश ढांगे हे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत पेट्रोलिंग करीत होते. भडगाव फाट्याजवळ असणाऱ्या एम.एस.ई.बी. कार्यालयासमोर थांबून ते वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी निढोरीकडून कागलकडे जाणाऱ्या हौदा टेम्पो (एमएच ११-ए ६-३५२७)वरील चालक पोलिसांची नजर चुकवून जात होता. त्यावेळी अगदी शिताफीने पोलिसांनी त्या टेम्पोला पकडले. टेम्पोची झडती घेतली असता हौद्यामध्ये प्लास्टिकची व गोणपाटाची दहा पोती पोलिसांना दिसली. त्यामध्ये लाकडाचे बारीक बारीक तुकडे भरल्याचे दिसून आले. ते तुकडे नरक्या या औषधी वनस्पतीचे असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी टेम्पोचालकासह अन्य एकाला तत्काळ ताब्यात घेतले.
जप्त केलेला नरक्या प्लास्टिकच्या आठ पिशव्या व दोन गोणपाटांतून कोल्हापूर येथे विक्रीसाठी नेला जात होता. त्याठिकाणाहून तो मुंबईकडे नेला जाणार होता, अशी धक्कादायक माहिती भीमराव कांबळे याने दिली. आपल्याला फोनवरून हा नरक्या कागल व कोल्हापूर शहराच्यामध्ये हायवेवर घेऊन येण्यास सांगितले असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी जप्त केलेला नरक्या अंदाजे २०० किलोहून अधिक आहे. या कारवाईमध्ये अधिकाऱ्यांबरोबर विशाल वाळेकर, हमीद शेख, एल. व्ही. धायगुडे, पोलीस कर्मचारी आवळकर, हुंबे, काशीद, संग्राम पाटील, कुंभार आदींनी भाग घेतला. मुरगूड पोलीस आरोपींकडून अधिक माहिती घेत आहेत. (वार्ताहर)