शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
3
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
5
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
6
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
7
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
8
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
9
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
10
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
11
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
13
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
14
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
15
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
16
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
17
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
18
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
19
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
20
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल

चित्रपटसृष्टीने काळाबरोबर बदलावे : कोल्हापूर चित्रपटनिर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 12:42 AM

भरत जाधव म्हणाले, ‘मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमाची परिभाषा वेगळी असते. पूर्वी लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत होते, आता सगळं मोबाईलवर उपलब्ध आहे. धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जगण्यामुळे चित्रपटांचा कौटुंबिक प्रेक्षक कमी झाला आहे.

ठळक मुद्दे आता कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती होत नसली तरी स्टुडिओ आणि अनुभवाच्या जोरावर पुन्हा येथे चित्रपट व्यवसाय स्थिरावू शकतो.

कोल्हापूर : स्मार्ट फोनसारख्या माध्यमांमुळे मनोरंजन आता प्रत्येकाच्या हातात आले आहे. वेब सिरीज, यू ट्यूब, मालिका, ट्रेलर, परदेशी सिरीयल, प्राईम व्हिडीओ, बातम्या, व्हॉटस् अ‍ॅप असे आधुनिक तंत्रज्ञान आणि काळानुरूप बदलणाऱ्या मनोरंजनाच्या माध्यमांची आव्हाने चित्रपटसृष्टीपुढे आहेत, त्यावर मात करायची असेल, तर चित्रपटसृष्टीनेही या युगाशी स्वत:ला जोडले पाहिजे, तरच या क्षेत्राचा आक्रमकतेने येणाºया मनोरंजन माध्यमांपुढे टिकाव लागेल, असे मत चित्रपटसृष्टीतील अभिनेते व जाणकारांनी मंगळवारी व्यक्त केले.

शाहू स्मारक भवनात मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने कोल्हापूर चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्यांतर्गत आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी मत नोंदविले. यात कलर्सचे चॅनेलप्रमुख निखिल साने, अभिनेता भरत जाधव, स्वप्निल राजशेखर, आनंद काळे, उमेश बोळके, चित्रपट अभ्यासक डॉ. कविता गगराणी, पत्रकार सौमित्र पोटे यांनी सहभाग घेतला. यावेळी निखिल साने म्हणाले, ‘मनोरंजनाचं जग वेगाने बदलत आहे. टीव्हीसमोर बसणारा

कोल्हापुरातील क्षमतेला हवी आधुनिकतेची जोडचित्रपटसृष्टीसाठी आपल्या जुन्या पिढीने खूप काही करून ठेवले आहे. मध्यंतरीचा काळ खडतर असला तरी अजूनही येथील तरुणाईमध्ये चित्रपट निर्मितीचे वेड आहे; त्यामुळेच अनेकजण पडद्यावर व पडद्यामागे कार्यरत आहेत. नैसर्गिक लोकेशन, स्टुडिओ, कलाकार, तंत्रज्ञांची फळी एवढ्या सगळ्या क्षमता असलेल्या कोल्हापुरात चित्रपट-मालिका व्यावसायिकांच्या गरजांनुसार सोईसुविधा मिळवून दिल्या तर मुंबईनंतर चित्रपट नगरी म्हणून कोल्हापूर पुन्हा पुढे येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. वर्ग वेगळा आहे. आताची पिढी मोबाईलवर वेबसिरीज, यूट्यूब, मालिका, ट्रेलर, परदेशी सिरीयल, प्राईम व्हिडीओ अशा माध्यमांना प्राधान्य देते. त्यांना जगभरातील माध्यमांचे भान आहे. एखाद्या चित्रपटाची अथवा मालिकेची निर्मिती, कथानक आणि अपेक्षित प्रेक्षक यावर त्याचे अर्थकारण ठरत असते.

भरत जाधव म्हणाले, ‘मनोरंजनाच्या प्रत्येक माध्यमाची परिभाषा वेगळी असते. पूर्वी लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघत होते, आता सगळं मोबाईलवर उपलब्ध आहे. धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जगण्यामुळे चित्रपटांचा कौटुंबिक प्रेक्षक कमी झाला आहे.

स्वप्निल राजशेखर म्हणाले, ‘मनोरंजनाच्या क्षेत्रात कोल्हापूरचा शिक्का असणं हे दुधारी तलवारीसारखं आहे, त्याचा फायदा होतो तसाच तोटाही होतो; त्यामुळे कलाकारांनी शुद्ध मराठी, हिंदी, इंग्रजीसह प्रादेशिक भाषांचा अभ्यास केला पाहिजे, गुणवत्तेत वाढ केली पाहिजे. त्यात कोल्हापुरी टोन येऊ न देता आपली भूमिका निभावता आली पाहिजे.

आनंद काळे म्हणाले, ‘चित्रपटनिर्मिती अथवा मालिकांसाठी मुंबईनंतर कोल्हापूरचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर वेब सिरीज, अ‍ॅनिमेशन, लघुपटसारख्या क्षेत्रातही येथील मुलं मोठ्या संख्येने काम करत आहेत. क्षमता असली की ग्रामीण भागातील मुलेही वेगाने पुढे येतात.’

कविता गगराणी म्हणाल्या, संस्थानकाळाचा चित्रपटांना राजाश्रय मिळाला, पुढे लोकाश्रय मिळाला. आता कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती होत नसली तरी स्टुडिओ आणि अनुभवाच्या जोरावर पुन्हा येथे चित्रपट व्यवसाय स्थिरावू शकतो.

सौमित्र पोटे यांनी कोल्हापुरात नैसर्गिक लोकेशन खूप असल्याने प्रत्यक्ष स्टुडिओत चित्रीकरणाचे प्रमाण कमी असेल, असे मत व्यक्त केले. चारुदत्त जोशी यांनी निवेदन केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी अभिनेत्री उषा नाईक, हेमसुवर्णा मिरजकर, माला इनामदार, माधवी जाधव, सुरेखा शहा, एन. रेळेकर, सदानंद सूर्यवंशी, शाम काने, रमेश स्वामी, अशोक काकडे, कृष्णा पोवार यांच्यासह चित्रपट व्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcinemaसिनेमा