शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आडवे येणाऱ्यांना पोलिसी खाक्या

By admin | Updated: January 12, 2015 00:37 IST

पंचगंगा प्रदूषण प्रश्न : विभागीय आयुक्ताचा इशारा; ‘एसटीपी’ला शेतकऱ्यांचा खोडा ;१२०० मीटर पाईपचा मार्ग मोकळा

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण कमी करण्यात ‘मैलाचा दगड’ ठरणाऱ्या कसबा बावडा येथील ७६ दशलक्ष सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, प्रक्रिया केलेल्या पाण्याचे वहन करण्यासाठी आवश्यक दोन किलोमीटर पाईपलाईनचे काम सुरू आहे. या कामात शेतकऱ्यांचा मोठा अडथळा येत आहे, अशी तक्रार पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांच्यापुढे महापालिका प्रशासनाने आज, रविवारी रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या आढावा बैठकीत केली. नदी प्रदूषण मुक्तीच्या आडवे येत पाईपलाईन रोखणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घ्या, अशी सूचना चोक्कलिंगम् यांनी केली. त्यामुळे कासवगतीने सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामास गती येऊन एसटीपी पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.
महापालिकेतर्फे कसबा बावडा येथे गेली तीन वर्षे सांडपाणी प्रक्रिया कें द्र उभारणी सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर शहरातून पंचगंगेत मैलामिश्रीत मिसळणारे तब्बल ७५ टक्के पाणी बंद होणार आहे. एसटीपी केंद्राची उभारणी पूर्ण झाली आहे. १२ एमएलडीप्रमाणे पाणी शुद्ध करणारे सहा बेसीन तयार आहेत. जयंती नाल्यातून उपसा होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असूनही हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकलेले नाही. परिणामी गेली सहा महिने सांडपाणी केंद्र २५ टक्के क्षमतेनेच सुरू आहे.
सांडपाणी केंद्रातून प्रक्रिया होणारे पाण्याचा बीओडी कमी असल्याने हे पाणी थेट नदीत मिसळल्यास पाण्यातील जैव नैसर्गिकतेला धोका निर्माण होणार नाही. मात्र, हे पाणी वाहून नेण्यासाठी दोन किलोमीटरची पाईपलाईन टाकण्याच्या कामास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. या विरोधामुळेच गेल्या सहा महिन्यांत फक्त ८०० मीटरच पाईपचे काम होऊ शकले आहे. अद्याप १२०० मीटरच्या पाईपलाईनचे काम रखडले आहे. ऊस तोडणीमुळेही हे काम संथगतीने सुरू आहे. शेतकऱ्यांची ऊस तोडणी त्वरित करण्याबाबत राजाराम कारखान्याने सहकार्य केले आहे तरीही काही शेतकरी पाईपलाईनच्या कामात अडथळा निर्माण करत आहेत, अशी तक्रार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एस. चोक्कलिंगम् यांच्याकडे केली. पाईपलाईनच्या कामात अथडळा आणल्यास त्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची मदत घ्या, अशी सूचना चोक्कलिंगम् यांनी केली. पोलिसांच्या मदतीने पाईपलाईन टाकण्याचे काम वेळेत व सुरळीत पार पडेल, अशी मनपा प्रशासनास आशा आहे. (प्रतिनिधी)