शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधील गटबाजी उफाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 13:51 IST

Ncp Kolhapur : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधील गटबाजी चांगलीच उफाळून आली आहे. माजी जिल्हाध्यक्षांकडून नूतन अध्यक्षांवर सोशल मीडियातून आरोप सुरू आहेत. पक्ष शिस्त मोडून बदनामी केल्याने पक्ष नेतृत्वाने संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियातून नूतन जिल्हाध्यक्षांवर आरोप पक्ष नेतृत्वाकडून कानउघाडणी

कोल्हापूर : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसमधील गटबाजी चांगलीच उफाळून आली आहे. माजी जिल्हाध्यक्षांकडून नूतन अध्यक्षांवर सोशल मीडियातून आरोप सुरू आहेत. पक्ष शिस्त मोडून बदनामी केल्याने पक्ष नेतृत्वाने संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनील गव्हाणे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुहास कदम यांची निवड झाल्यानंतर त्यांनी सेल मजबुतीसाठी आढावा दौरा केला. यामध्ये जिथे सेल कमकुवत आहे, ते बरखास्त केले. कोल्हापूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे काम समाधानकारक नव्हते. तीन-चार वर्षांपासून संघटनात्मक पातळीवर काहीच काम नसल्याने जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त केली.

जिल्हाध्यक्ष पदाच्या मुलाखती घेऊन व जिल्ह्यातील नेत्यांच्या शिफारसीनुसार नवीन चेहऱ्याला संधी दिली. त्यामुळे माजी जिल्हाध्यक्ष नाराज झाले आणि सोशल मीडियातून बदनामीकारक मजकूर टाकत आहेत. मोजक्या कार्यकर्त्यांना घेऊन पक्षासह जिल्ह्यातील नेत्यांची बदनामी सुरू केल्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. माजी जिल्हाध्यक्षाच्या कृत्याची गंभीर दखल पक्षाने घेतली असून, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्याची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर