शहरं
Join us  
Trending Stories
1
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
2
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
3
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
4
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
5
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
6
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
7
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
8
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
9
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
10
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
11
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
12
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
13
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
14
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
15
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
16
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
17
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
18
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
19
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
20
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
Daily Top 2Weekly Top 5

लाटगाव येथे घरावर हत्तीचा हल्ला

By admin | Updated: January 20, 2015 23:33 IST

रात्रभर भीतीच्या छायेत : प्रसंगावधान राखल्याने देसाई कुटुंबीय बचावले; बैलगाडी मोडली, केळी उद्ध्वस्त

आजरा : लाटगाव (ता. आजरा) येथे रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुभाष भीमराव सरदेसाई यांच्या घराला हत्तीने लक्ष्य बनवीत घरावर व घराच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंवर हल्ला चढविला. यामध्ये घराच्या भिंतीला तडा गेला असून ती काहीशी ढासळल्याने हलली आहे. हत्तीने बैलगाडी, नारळाची झाडे यांचे मोठे नुकसान केले आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हत्ती सातेवाडी लाटगाव येथील जंगलातून थेट आनंदा दादासो देसाई यांच्या सातेवाडी हद्दीतील ऊसपिकात प्रवेश केला. गावापासून दूर शेतात हत्ती दिसल्याने शेतीकामाकरिता गेलेल्यांनी शेतातून गावाकडे पळ काढला. यावेळी हत्तीने आनंदा देसाई यांची बैलगाडी, काजूची झाडे, ऊस पिकाचे नुकसान केले. सूर्यकांत आण्णासोा सरदेसाई यांच्या शेतातील ऊस पिकाचा फडशा पाडत रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेतावर राहणाऱ्या सुभाष सरदेसाई यांच्या घरावर आपला मोर्चा वळविला.हत्तीच्या चित्कारांनी शेतावर राहणारे सरदेसाई कुटुंबीय जागे झाले. हत्तीने दारातील नारळाच्या झाडांचे नुकसान केले. त्यांची बैलगाडी मोडून टाकली. घरामध्ये स्वत: सरदेसाई, त्यांच्या पत्नी कांचन व मुलगा असे तिघेजण होते. त्यांच्या घरापासून सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत एकही घर नसल्याने ते होणारा प्रकार घरातून पाहत होते. हत्तीला त्यांची चाहूल लागताच त्याने घराच्या भिंतीला ढकलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये घराच्या भिंतीला तडेही गेले.दरम्यान, कुत्र्यांनी व गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या आवाजाने हत्तीने घरापाठीमागील जागेतून तासाभरानंतर जंगल गाठले. रात्रभर भीतीच्या छायेखाली असलेल्या सरदेसाई कुटुंबीयांनी सकाळी घराचा दरवाजा उघडून झाला प्रकार पाहिला.गावात दिवसभर भितीचे वातावरण होते. दरम्यान, वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी सरदेसाई कुटुंबीयांची भेट घेऊन झाल्या प्रकाराची माहिती घेतली. (प्रतिनिधी)