शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

डंपरची दुचाकीला पाठीमागून धडक, शिये फाटा येथे महिला जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 13:06 IST

वडगाव न्यायालयात होत्या लिपिक : डंपर चालक पसार

शिरोली : डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने शिये फाटा येथे झालेल्या अपघातात वडगाव न्यायालयातील महिला लिपिक वैशाली अजित पोळ (वय ४०, रा.मराठा काॅलनी, कसबा बावडा) या जागीच ठार झाल्या. हा अपघात बुधवारी सायंकाळी ६:४० वाजता घडला. अपघातानंतर डम्पर चालक फरार झाला.

घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, वैशाली पोळ या गेल्या तीन वर्षांपासून वडगाव न्यायालयात लिपिक पदावर काम करीत होत्या. दररोज त्या कसबा बावडा ते पेठवडगांव न्यायालयात आपल्या दुचाकीवरून जातात आणि परत सायंकाळी घरी येतात. बुधवारीही पोळ या वडगाव न्यायालयातून सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या गाडीवरून घरी येण्यासाठी निघाल्या. ६:४०च्या सुमारास शिये फाटा येथून कसबा बावड्याच्या दिशेने येत असताना, याच वेळी पाठीमागून भरधाव आलेल्या डंपरने पोळ यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यात पोळ या रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने डोके फुटून त्या जागीच ठार झाल्या. 

अपघातानंतर डंपर चालक डम्पर घेऊन शियेच्या दिशेने वेगाने पसार झाला. या अपघातानंतर शिये फाटा येथील टपऱ्या बंद झाल्या आणि अपघातस्थळी गर्दी झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. शिरोली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूककोंडी सुरळीत केली, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.

पोळ यांच्यापश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. अपघाताची वार्ता समजताच, वडगाव न्यायालयातील पोळ यांचे सहकारी सीपीआर रुग्णालयात दाखल झाले होते. या घटनेची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू