शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

चर्माेद्योग महामंडळात कर्ज घोटाळा

By admin | Updated: December 30, 2016 00:03 IST

गुन्हा दाखल : अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संगनमत; गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता

प्रकाश पाटील --कोपार्डे  ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ हा वाक्यप्रचार सार्थ करण्याचे काम पासार्डे (ता. करवीर) येथील मल्ल विजय पाटील याने केले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या ५७ किलो वजनी गटात गादी विभागात विजय पाटील याने सलग दोन वर्षे सुवर्णपदकांची कमाई केली. या कामगिरीने त्याने गवंडी असलेल्या वडिलांच्या कष्टाला आपल्या मेहनतीने सुवर्ण कोंदण निर्माण केले आहे. आपली ऐपत नसतानाही बाजीराव पाटील यांनी विजयला कुंभी कासारीच्या कुस्ती संकुलामध्ये दाखल केले. येथे प्रशिक्षक तानाजी पाटील व प्रकाश पाटील यांनी त्याच्या मनगटातील ताकद व कुस्तीतील डावावर असणारी हुकूमत निर्माण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. या दरम्यान तो शालेय कुस्ती स्पर्धाही गाजवू लागला. मागील वर्षी विजयची कॅडेट कुस्तीमध्ये ‘आशियाई चॅम्पियन’साठी चीनमध्ये झालेल्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्याने मागील वर्षी नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले होते. याहीवर्षी कोल्हापूर जिल्ह्यातून त्याची याच गटासाठी सुवर्णपदकाचा मानकरी होण्यासाठी मातब्बर प्रतिस्पर्धीसमोर असल्याने विजयने जिवाचे रान करून मेहनत घेतली. चाचणी स्पर्धेबरोबर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या लढतीच्या दरम्यान उपांत्य लढतीपर्यंत प्रतिस्पर्धी मल्लांवर एकतर्फी विजय मिळविले. यात कल्याण, पिंपरी, चिंचवड व लातूर जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे मल्ल होते. उपांत्य सामन्यात सांगलीच्या बापू कोळेकरवर १० विरुद्ध ० असा एकतर्फी विजय मिळविला व अंतिम सामन्यात दिमाखदार प्रवेश केला. अंतिम सामन्यात विजयने बानगे (ता. कागल) येथील मल्ल अभिजित पाटील याच्यावर १० विरुद्ध ० अशी गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. सुवर्णपदक मिळविण्याची ही त्याची सलग दुसरी वेळ असल्याने विजयच्या पासार्डे गावी एकच जल्लोष झाला. विजय सध्या पुणे येथे सह्याद्री क्रीडा संकुलमध्ये सराव करीत असून, त्याला विजय बराटे, दिलीप पडवळ, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. लहान वयातच विजयला तालमीची ओढ होती. त्याच्यातील चपळाई व स्टॅमिना पाहून लोकांमधूून त्याला पैलवान करा, असा सल्ला येत होता. आतापर्यंत त्याने विविध स्पर्धांमध्ये २२ पदके व १७ चषक पटकावून आमच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत. त्याने आॅलिम्पिकमध्ये भाग घ्यावा एवढी इच्छा आहे. - बाजीराव पाटील, वडील