शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

CPR Hospital Kolhapur : परिचारिकांच्या सेवेला समाजाचा सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 18:54 IST

CPR Hospital Kolhapur : कुटुंबातील सदस्याप्रमाणेच अहोरात्र रुग्णांच्या सेवेचे व्रत जपणाऱ्या सेवाव्रती परिचारिकांवर बुधवारी जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कौतुकाचा वर्षाव झाला. त्यांच्या सेवाव्रती भावनांना उजाळा देत समाजातील अन्य घटकांनीही त्यांच्या योगदानाची दखल घेतल्याने परिचारिकांना आनंदाचे भरते आले.

ठळक मुद्देपरिचारिकांच्या सेवेला समाजाचा सलामपरिचारिका दिनाचे निमित्त कार्याचा उजाळा

कोल्हापूर : कुटुंबातील सदस्याप्रमाणेच अहोरात्र रुग्णांच्या सेवेचे व्रत जपणाऱ्या सेवाव्रती परिचारिकांवर बुधवारी जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने कौतुकाचा वर्षाव झाला. त्यांच्या सेवाव्रती भावनांना उजाळा देत समाजातील अन्य घटकांनीही त्यांच्या योगदानाची दखल घेतल्याने परिचारिकांना आनंदाचे भरते आले.आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस जगभर परिचारिका दिन म्हणून साजरा केला. कोल्हापुरातही बुधवारी सीपीआरमध्ये मुख्य कार्यक्रम झाला. कोरोनासारख्या साथीच्या आजारामध्ये परिचारिकांचे आरोग्य व्यवस्थेतील योगदान सर्वसामान्यांना अधिक जवळून कळाल्याने यावर्षीच्या या कौतुक सोहळ्याला आदरयुक्त किनार लाभली. परिचारिकांनी आपापसात शुभेच्छा देत, सेल्फी काढत हा दिन साजरा केला तर समाजातील अन्य संवेदनशील वर्गाने त्यांच्या कार्याचा उजाळा म्हणून स्टेटस ठेवून, फोनवरून शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात सहभाग नोंदवला.सीपीआरमध्ये नर्सिंग कॉलेजमध्ये बुधवारी नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याप्रमाणे वाटचाल करण्याची शपथ घेण्यात आली. अधिसेविका बी. एस. मोमीन यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. मंदाकिनी पाटील, सी. पी. साळोखे, नेहा कापरे यांच्यासह परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या. 

परिचारिका क्षेत्रात मक्तेदारी, शासनाचे दुर्लक्ष, प्रचंड ओढाताण असली तरी देखील परिचारिका असल्याचा मला सार्थ गर्व आहे. या व्यवसायानेच मला वेगवेगळे अनुभव दिले, स्वावलंबी जगता आले. -माधुरी हळबे, अधिपरिचारिका, सीपीआर

 

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर