शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: January 9, 2015 00:25 IST

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : कचरा उठाव करताना जंतुसंसर्गाचा धोका

एकनाथ पाटील - कोल्हापूर -शहरात पावला-पावलावर साचलेला कचरा उठाव करून कोल्हापूर स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्गंधीयुक्त, सडलेल्या कचऱ्याचा उठाव करताना हातांना ग्लोव्हज, चेहऱ्याला मास्क, पायांत गमबूट, अंगावर प्लास्टिकचा कोट अथवा गाऊन अशी कोणतीच स्वसंरक्षणार्थ साधनसामग्री जवळ नाही; त्यामुळे कर्मचाऱ्यांना जंतुसंसर्गाचा धोका उद्भवला असून, महापालिका प्रशासनाने मात्र याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
अशी वस्तुस्थिती असली तरी महापालिका प्रशासन कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षणार्थ साधनसामग्रीची पूर्तता केली असल्याचे सांगत आहे. मग ती प्रत्यक्षात कचरा उठाव करताना कर्मचाऱ्यांच्या अंगावर का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरात दररोज १८० टन घनकचरा साचला जातो. महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाची कचरा उठावाची स्वतंत्र, सक्षम यंत्रणा कार्यरत आहे. त्यामध्ये कायमस्वरूपी १२००, तर रोजंदारी २५० कामगार आहेत. कायमस्वरूपी कामगारांना सरासरी १२ हजार रुपये महिना वेतन मिळते; तर रोजंदारी कामगारांना दिवसा २५० रुपये हजेरी दिली जाते. शहरात दररोज सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत स्वच्छता मोहीम राबविली जाते. या वेळेत सफाई कर्मचारी दिलेल्या भागात स्वच्छता करतात, तसेच साचलेला कचरा ट्रकमधून उचलत असतात. याशिवाय शहराच्या काही भागांत रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत अशाच प्रकारची मोहीम राबविली जाते. कचऱ्याची विल्हेवाट हा गंभीर प्रश्न असल्याने कचरा कोंडाळ्यांमुळे शहरवासीयांना डासांचा प्रादुर्भाव तसेच जंतुसंसर्ग होण्याची शक्यता ओळखून रोजच्या रोज कचऱ्याचा उठाव केला जातो. पुरुष कर्मचारी खाकी शर्ट-पॅँट, तर महिला निळ्या साड्यांमध्ये शहरात कचरा उठाव करताना दिसून येतात. त्यांच्याजवळ ग्लोव्हज, चेहऱ्याला मास्क, पायांत गमबूट, अंगावर प्लास्टिकचा कोट अथवा गाऊन अशी कोणतीच स्वसंरक्षणार्थ साधनसामग्री दिसून येत नाही. औषध फवारणी किंवा गटारे साफ करतानाही कर्मचाऱ्यांना श्वास रोखूनच साफसफाई करावी लागते. कचऱ्याच्या दुर्गंधीमधून तर कर्मचाऱ्यांना अनेक रोगरार्इंना सामोरे जावे लागते. महापालिकेने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी चालविलेला हा खेळ त्वरित थांबवावा, अशी मागणी होत आहे.