शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: निवासी शाळेत मुलांना बनविले मजूर, पालक आक्रमक; अनेकांनी केला प्रवेश रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 15:37 IST

कोल्हापूर : कळंबा परिसरात नव्याने इमारत बांधकामासाठी निवासी शाळेतील पाचवी ते सहावीच्या मुलांचा वापर केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस ...

कोल्हापूर : कळंबा परिसरात नव्याने इमारत बांधकामासाठी निवासी शाळेतील पाचवी ते सहावीच्या मुलांचा वापर केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी उघडकीस आला. सांगलीतील एका विद्यार्थ्यांने मोबाइलवरून सुरू असलेला हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर या शाळेत अन्य पालकांनी येथे जाऊन आक्रमक पवित्रा घेत संचालकाला धारेवर धरले.घटनास्थळी पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबा परिसरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरात भाडेतत्त्वावर एक निवासी शाळा आहे. या शाळेचे कळंबा रोडवरील गणपती मंदिराजवळ नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या कामासाठी शाळेतील मुलांचा वापर होत असल्याचा आरोप पालकांनी केला. शाळेतील एका मुलाने गेले तीन महिने हा सुरू असलेला प्रकार पालकाला सांगितला. ते पालक तत्काळ या ठिकाणी आले. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या असलेल्या पालकांना ही घटना सांगितली. या सर्वांनी त्या निवासी शाळेच्या संचालकाला जाब विचारला. घडलेल्या प्रकाराची फिर्याद पोलिसांत देणार असल्याचे सांगताच विद्यार्थ्यांकडून काम करवून घेत असल्याची कबुली देऊन त्याने वर्षभराचे घेतलेले शैक्षणिक शुल्क परत दिले. या शाळेतून विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला असल्याचे पालकांनी सांगतिले. सुमारे तासभर हा प्रकार सुरू होता. या निवासी शाळेत दुसरी ते दहावीपर्यंतचे सुमारे ५० विद्यार्थी आहेत. दरम्यान त्या शाळेच्या संचालकांशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीCrime Newsगुन्हेगारी