कुसुमाग्रजांच्या काव्यवाचनाने माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 05:00 PM2020-02-29T17:00:27+5:302020-02-29T17:01:31+5:30

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जात-जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यांतील भिंती तसं म्हटलं तर गाभाºयाचंच महत्त्व अंतिम असतं. ‘गाभारा सलामत तो देव पचास’ कवी कुसुमाग्रजांच्या ‘प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे वाचन करून विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.

Celebrate Marathi Language Day at the information office with poetry reading by Kusumagraj | कुसुमाग्रजांच्या काव्यवाचनाने माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा

कोल्हापुरातील विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एस. आर. माने, एकनाथ पोवार उपस्थित होते

googlenewsNext
ठळक मुद्देमाहिती कार्यालयात कुसुमाग्रजांच्या काव्यवाचन मराठी भाषा दिन साजरा

कोल्हापूर : गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान. एकेक जात-जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी मात्र फक्त सरकारी कचेऱ्यांतील भिंती तसं म्हटलं तर गाभाºयाचंच महत्त्व अंतिम असतं. ‘गाभारा सलामत तो देव पचास’ कवी कुसुमाग्रजांच्या ‘प्रवासी पक्षी’ या काव्यसंग्रहाचे वाचन करून विभागीय माहिती कार्यालयात मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला.

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी मराठी भाषेच्या उगमाविषयी माहिती दिली तसेच त्यांनी ‘पण एक लक्षात ठेवा, ज्योतीराव, तुम्ही आता फक्त पुतळा आहात, पुतळ्यांना अधिकार नसतो संतप्त होण्याचा, भोवतालच्या व्यवहारात उतरण्याचा, त्यांना अधिकार असतो फक्त जयंती-मयंतीच्या हारांचाआणि एरव्ही काकादिक पक्ष्यांच्या विष्ठाप्रधान सहवासाचा, यासह कुसुमाग्रजांच्या प्रवासी पक्षी काव्यसंग्रहातील अखेर कमाई गाभारा ज्योतीराव आणि कणा या कवितांचे वाचन केले.

निवृत्त माहिती अधिकारी एस. आर. माने, माहिती साहाय्यक एकनाथ पोवार यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक रामदास परब यांनी यावेळी मराठीतील म्हणी सांगितल्या. यावेळी जिल्हा माहिती कार्यालय आणि विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थितीत होते.

 

 

Web Title: Celebrate Marathi Language Day at the information office with poetry reading by Kusumagraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.