घरात घुसून साहित्यांची तोडफोड  : महिलेवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 12:50 IST2021-03-25T12:47:25+5:302021-03-25T12:50:49+5:30

Crime News Women Kolhapur- किरकोळ कारणावरून महिलेच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्याची घटना नागाळा पार्कमध्ये घडली. याप्रकरणी सबा रशीद शेख (रा. ताराबाई पार्क) या महिलेवर शाहुपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

Breaking into a house and breaking literature: Crime against a woman | घरात घुसून साहित्यांची तोडफोड  : महिलेवर गुन्हा

घरात घुसून साहित्यांची तोडफोड  : महिलेवर गुन्हा

ठळक मुद्देघरात घुसून साहित्यांची तोडफोड  : महिलेवर गुन्हा नागाळा पार्क येथील घटना

कोल्हापूर : किरकोळ कारणावरून महिलेच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याचे नुकसान करण्याची घटना नागाळा पार्कमध्ये घडली. याप्रकरणी सबा रशीद शेख (रा. ताराबाई पार्क) या महिलेवर शाहुपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी रात्री गैरसमजातून संशयित शेख हिने जोत्स्ना अशोकराव गायकवाड (रा. विवेकानंद कॉलेजशेजारी, नागाळा पार्क) यांच्या घरात घुसून त्यांच्याशी वादावादी केली.

त्यानंतर जोत्स्ना यांना व त्यांच्या आईस धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून बघून घेण्याची धमकी दिल्याचे गायकवाड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Breaking into a house and breaking literature: Crime against a woman