शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल बंदच्या निषेधार्थ कामगारांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:41 IST

CoronaVirus Kolhapur- लॉकडाऊनमधील हॉटेल बंदच्या निर्णयाच्या निषेधार्थ कोल्हापुरात बुधवारी हॉटेल कामगार संघटनेतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात सुमारे शंभर कामगारांनी रक्तदान केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हॉटेल सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा या कामगारांनी यावेळी दिला.

ठळक मुद्देहॉटेल बंदच्या निषेधार्थ कामगारांचे रक्तदान शंभर जणांचा सहभाग : आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा

 कोल्हापूर : लॉकडाऊनमधील हॉटेल बंदच्या निर्णयाच्या निषेधार्थ कोल्हापुरात बुधवारी हॉटेल कामगार संघटनेतर्फे रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात सुमारे शंभर कामगारांनी रक्तदान केले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून हॉटेल सुरू ठेवण्यास सरकारने परवानगी द्यावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा या कामगारांनी यावेळी दिला.

बिंदू चौक येथील हॉटेल कामगार संघटनेच्या कार्यालयात रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये संघटनेचे राज्य संघटक गिरीश फोंडे, धीरज कठारे, सुशांत पोवार, राहुल गोते, नितेश केसरकर, अनिल कांबळे , आनंदा कांबळे, शरद पाटील विजय परीट, संतोष वंदुरे, योगेश गुंडलकर ,विष्णू शेळके, अजित लटके ,पुरुषोत्तम कुलकर्णी, नितेश खेतल, निलेश कांबळे, प्रवीण बागडी, विठ्ठल झोरे ,मनोज भुरके, राजेंद्र पाटील ,बबन पाटोळे, रोहित माने, रमेश पोवार, आदी सहभागी झाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाचा हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे राज्यातील लाखो हॉटेल कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर संकट कोसळणार आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे या कामगारांना दहा महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत हॉटेल चालू ठेवण्याची परवानगी द्यावी. हॉटेल मालकांसमवेत कामगार संघटनेची बैठक घ्यावी. कोरोना काळात प्रत्येक हॉटेल कामगारास मासिक वीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राज्य संघटक गिरीश फोंडे यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBlood Bankरक्तपेढीkolhapurकोल्हापूर