शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
6
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
9
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
10
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
12
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
13
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
16
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
17
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
18
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
19
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
20
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन ग्रामसेवकावर ठपका

By admin | Updated: January 10, 2015 00:21 IST

अनधिकृत बांधकाम प्रकरण : खातेनिहाय चौकशी अहवालात स्पष्ट; पुढील कारवाईकडे लक्ष

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) ग्रामपंचायतीमधील तत्कालीन ग्रामसेवक एकनाथ सदाशिव सूर्यवंशी यांची सहायक आयुक्तांनी खातेनिहाय चौकशी केली. चौकशीत अनियमित, नियमबाह्य कामकाज, अनधिकृत बांधकामास परवानगी देऊन कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका सूर्यवंशी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सन २०१० मध्ये सूर्यवंशी ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. उचगाव गावास इचलकरंजी प्रादेशिक असंविधानिक विकास योजना लागू आहे. या योजनेचे नियोजन प्राधिकारी हे जिल्हाधिकारी आहेत.
त्यामुळे गावठाण हद्दीबाहेर इमारत बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तथापि, उचगाव येथील रि. स. नंबर ८४/८७, ९१, ९२ ते १०३, १२४, १४४, १४६ ते १४८ या सर्व उचगाव मिळकती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सामाविष्ट आहेत. आरक्षण क्रमांक २५७ कचरा टेपोसाठी व आरक्षण क्रमांक १५८ ट्रक टर्मिनस विकास विभागामध्ये दर्शविला आहे.
दरम्यान, सूर्यवंशी यांनी आपल्या कालावधीत रि. स. नंबर ८४/८७, ९१, ९२ ते ९६, १०० ते १०३, १२४, १४४, १४६ ते १४८ मध्ये बांधकामास नियमबाह्य परवानगी दिली. कागदपत्रांची खातरजमा न करता अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली आहे. नियमापेक्षा जादा मजले बांधकामसही परवानगी दिली आहे. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केली आहे.
दरम्यान, अतिक्रमणाची तक्रार माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल कदम यांनी केली होती.
१८ जून २०१२ रोजी बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधकाम केलेल्यांवर कारवाई करावी, अशी शिफारस नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती.
मात्र, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्कालीन गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांना संगनमताने अभय दिले. या प्रकरणात दोषी ग्रामसेवक तलाठी यांच्यावर कारवाई करावी, अशीही तक्रार कदम यांनी केली आहे. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)