शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

'छोट्या कारची मोठी गोष्ट', राज ठाकरेंनी सांगितलेली गरीबांची 'मीरा' कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 16:32 IST

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची "नॅनो" माहितंय,

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी इचलकंरजी येथील आपल्या भाषणात टाटाच्या नॅनो कारचा उल्लेख केला होता. तसेच, इंचलकरंजी येथील भाषणात मराठी माणसाची हुशारी आणि मराठी माणसाचे कर्तृत्व सांगतिले होते. रतन टाटांनी सर्वसामान्यांसाठी नॅनो कार बनवली. पण, त्यापूर्वीही इचलकरंजीतील मराठी माणसाने नॅनोसारख्या सर्वसामान्यांना परवडेल अशा कारची निर्मित्ती केल्याचे राज यांनी सांगतिले होते.  

‘सामान्य माणसाची कार’ म्हणून आपल्या सगळ्यांनाच रतन टाटांची "नॅनो" माहितंय, पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना ही गोष्ट माहित असेल की, अशा प्रकारचा प्रयोग देशात साधारणतः 50 वर्षापूर्वीच झाला होता. अगदी नॅनोपेक्षाही छोटी आणि नॅनोमध्ये असणारे जवळपास बरेचसे फीचर्स असणारी कार 1975 साली मुंबईच्या रस्त्यावर धावली होती. 

‘मीरा’ कार या नावाने ही कार ओळखली जात असे आणि ती कार एका मराठी माणसानेच बनवली होती. शंकरराव कुलकर्णी असे त्यांचे नाव होते. विशेष म्हणजे शंकररावांचं शिक्षण फक्त सातवीपर्यंत झालेलं, इचलकरंजीच्या एका सातवी पास महाराष्ट्रीयन माणसाने देशाला, इतिहासातील सर्वात छोटी आणि सामान्य माणसाच्या बजेटमधली कार दिली होती. या कारची किंमत 12,000 रुपये होती. सिंगल वायपर, रिअर इंजिन, ५ सीटर, २० किमी प्रतिलिटर मायलेज ही या कारची काही महत्वाची फीचर्स होत. विशेष म्हणजे या कारचे बहुतेक महत्वाचे पार्टस देसी होते. कारचं इंजिनही भारतीय बनावटीचं होते. त्या काळात शंकरराव चव्हाण, शंतनुराव किर्लोस्कर, मोहन धारिया, राजारामबापू पाटील यांसारख्या अनेक प्रतिष्ठितांनी या कारमधून प्रवास केला होता. किर्लोस्करमध्ये काम करणाऱ्या शंकररावांनी आपल्या 15 जणांच्या टीमसोबत 1945 मध्ये कार बनवण्याच्या आपल्या कल्पनेवर काम सुरु केले.

सन 1949 मध्ये शंकररावांनी या कारचे पहिले मॉडेल तयार केले. त्यात ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर दोन माणसे बसू शकत असत. पुढच्या दोन दशकांच्या काळात या मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करून अद्ययावत असे अजून 5 मॉडेल त्यांनी बनवले होते. शंकररावांनी जी पहिली कार बनवली होती, तीचा आरटीओ मधला नोंदणी क्रमांक एम.एच.के.1906. असा होता. इचलकरंजीच्या रस्त्यावर ही कार शंकरराव केव्हापासूनच चालवत होते, पण व्यावसायिक पातळीवर या कारच्या निर्मितीत उतरण्यासाठी सर्वप्रथम मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे ही कार प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी खंडाळा घाटातून प्रवास करत शंकररावांनी ती मुंबईत आणली होती. 1975 साली जयसिंगपूर नगरपालिकेने या कारच्या निर्मितीसाठी शंकररावांना प्लांट स्थापन करण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली होती. पण, लालफितीतला कारभार आणि नोकरशाहीचा ढिम्म प्रतिसाद यांमुळे या प्रकल्पाचे पुढे काहीच होऊ शकले नाही. मीरा कारचे मॉडेल मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात येण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता होती. तसेच अनेक शासकीय परवानग्याही गरजेच्या होत्या. त्या मिळविण्यात शंकररावांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय त्याचकाळात सुझुकीसुद्धा या क्षेत्रात भारतात प्लांट सुरू करण्याच्या तयारीत असल्याने शंकररावांना सरकारकडून परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे हा प्रकल्प तिथेच रखडला. तर, शंकररावांना अनेक आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागले होते. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेkolhapurकोल्हापूरmarathiमराठी