शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून साकारला दुर्मीळ वृक्षांचा सुंदर बगीचा

By admin | Updated: January 9, 2015 00:24 IST

दुर्लक्षित जागेचा विकास : राजारामपुरीतील कोरगावकर व सन्मित्र हौसिंग सोसायटीचा नवा आदर्श

कोल्हापूर : चाळीस वर्षे पडून असलेली जागा, ड्रेनेजच्या पाण्याने झालेली दलदल, शेणी, खरमातीची मुबलकता यांमुळे शहराच्या मध्यवस्तीत असूनही दुर्लक्षित राहिलेल्या दीड एकर जागेत आज, गुरुवारी राजारामपुरीतील कोरगावकर व सन्मित्र हौसिंंग सोसायटीच्या प्रयत्नांतून सुंदर बगीचा फुलला आहे.नेहमी प्रत्येक गोष्ट महापालिकेने करावी, यासाठी आंदोलने सुरू असतात; पण, लोकांनीच आपल्या भागाच्या विकासासाठी प्रयत्न केला तर किती मोठे काम करता येते, याचा आदर्श राजारामपुरीतील या दोन सोसायट्यांनी आपल्या कामातून कोल्हापूरकरांना घालून दिला आहे. कोरगावकर सोसायटीतील मानसिंग चव्हाण व जयंत कुलकर्णी यांच्या कल्पक विचारातून व भागातील नागरिकांच्या प्रयत्नातून हा सुंदर बगीचा साकारला आहे. या बागेत असंख्य दुर्मीळ वनस्पती लावण्यात आल्या आहेत. त्यात प्रामुख्याने गोरखचिंच, रक्तचंदन, बेल, तुळस, आपटा, कोकम, पळस, कदंब, कैलासपती अशा नानाविध वृक्षांचा तसेच फुलझाडांचा समावेश आहे. बागेला मजबूत कंपौंड वॉल, वॉकिंग ट्रॅक, वयोवृद्धांना विश्रांतीसाठी बाकांची सोय करण्यात आली आहे. महिलांसाठी प्राणायामाचे प्रशिक्षणही येथे दिले जाते.
वृक्षांना पाण्याचा तुटवडा होऊ नये यासाठी कूपनलिका मारली आहे. टॉयलेट, वॉचमनसाठी स्वतंत्र केबिन, साफसफाईची व्यवस्था, अशा प्रकारे बागेची देखभाल दोन्ही सोसायट्यांकडून केली जाते. या दुर्मीळ वृक्षांच्या संवर्धनासाठी अनेकांनी सढळ हातांनी मदत केली आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमदार निधीमधून निधी दिला आहे. तसेच भागातील नगरसेवक राजू पसारे यांनीही मदत केली आहे. ‘कोरगावकर’चे चेअरमन व कार्यकारी संचालक, ‘सन्मित्र’चे चेअरमन व कार्यकारी संचालक या सर्वांनी वेळोवेळी निधी मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला आहे. सोसायटीचे सभासद, भागातील ज्ञात-अज्ञातांनी या कार्यात आपला खारीचा वाटा उचलून सढळ हस्ते मदत केल्याने सहभागातून हा देखणा बगीचा साकारला आहे. आमदार राजेश क्षीरसागर व महापालिकेच्या आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी बागेला भेट देऊन सोसायटीच्या सभासदांचे कौतुक केले. त्याच्या देखभालीसाठी व इतर सहकार्यासाठी सदैव तत्पर राहू, अशी त्यांनी ग्वाही दिली. याबाबतचे
पत्रक मानसिंग चव्हाण व जयंत कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिले
आहे. (प्रतिनिधी)