वीरशैव समाजातर्फे बसवेश्वर जयंती मिरवणूक; महिलांचा मोठा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 15:10 IST2026-04-20T15:10:06+5:302026-04-20T15:10:52+5:30
चित्रदुर्ग मठ येथून प्रारंभ, चित्ररथ, पोस्टर तसेच बालचमूंच्या विविध वेशभूषा ठरले आकर्षण

वीरशैव समाजातर्फे बसवेश्वर जयंती मिरवणूक; महिलांचा मोठा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा बसवेश्वर महाराज की जय' असा जयघोष, बॅण्ड पथक, झांज पथक, बैंजो पथक आदी वाद्यांच्या निनादात वीरशैव समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमांची पालखीसह भव्य मिरवणूक वीरशैव समाजातर्फे रविवारी काढण्यात आली.
सायंकाळी पाच वाजता दसरा चौकातील चित्रदुर्ग मठापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, बाळासाहेब साव्याण्णावर यांच्या हस्ते झाले.
विविध चित्ररथ, पोस्टर यांनी सजविलेली बग्गी व चित्रदुर्ग मठाचे मठाधीश शिवानंद महास्वामी सामील झाले होते. विशेष म्हणजे, घोड्यावर स्वार झालेले बालचमू हे शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, छ. संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या वेशभूषेत सामील झाले. है या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. महिलांनी मोरपंखी रंगाची साडी व पुरुषांनी सफेद रंगाचे पोशाख परिधान केले, हे सुद्धा आकर्षण ठरले.
वीरशैव समाजाचे अध्यक्ष किरण गवळी, उपाध्यक्ष राहुल नष्टे, सचिव सुनील गाताडे, राजू वाली, सुहास भेंडे, राजेश पाटील चंदूरकर, केतन तवटे, अविनाश नासीपुडे, चंद्रकांत हळदे, राजेंद्र करंबळी, चंद्रकांत नासीपुडे, गुरुदेव स्वामी, संजय बोधले, गणेश सन्नकी, धर्मेंद्र नष्ट, प्रशांत करंबळी, सत्यजित सांगावकर, महिला मंडळाच्या अध्यक्षा मंदा कुलकर्णी, उपाध्यक्ष अमृता करंबळी आदी मिरवणुकीत सहभागी होते.
एकसारखे पोशाख
मिरवणुकीत महिलांनी मोरपंखी साडी परिधान केली होती. पुरुषांनी सफेद रंगाचे पोषाख परिधान केले होते. हेही या मिरवणुकीचे आवार्षण ठरले.