शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
2
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
3
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
4
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
5
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
6
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
7
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
8
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
9
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
11
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
12
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
13
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
14
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
15
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
16
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
17
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
18
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
19
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
20
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी गटाच्या हालचालींकडे लक्ष

By admin | Updated: January 14, 2015 00:38 IST

आजरा तालुक्यातील राजकारण : सतेज पाटील यांची भूमिक महत्त्वपूर्ण

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा -कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या हालचाली वेगावल्या आहेत. विरोधी आघाडीकडून कोण? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित असला, तरी राष्ट्रवादीकडून दंड थोपटल्यास रंगत येईल.
आजरा तालुक्यातील २७५ संस्थांपैकी २१५ संस्था मतदानास पात्र आहेत. गेली पाच वर्षे आपटेंची पेरणी सुरू आहे. जिल्हापातळीवरील राजकारणात राष्ट्रवादीने विद्यमानांच्या विरोधात दंड थोटपले, तर राष्ट्रवादीकडून वसंतराव धुरे अथवा उदय पवार या आजरा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षांपैकी एकाचे नाव पुढे येऊ शकते. माजी गृहराज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यास कै. केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा अंजनाताई रेडेकर यांचे नाव पुढे येऊ शकते. कै. शिवपुत्रअण्णा शेणगावे, वसंतराव धुरे, उदय पवार यांनी आपटे यांच्या विरोधात यापूर्वीही दंड थोपटले होते.
गत निवडणुकीत उदय पवार यांनी आपटेंशी लढत देण्याचा प्रयत्न केला; परंतु यामध्ये आपटे यांनी एकतर्फी विजय मिळविला. बदलत्या संदर्भानुसार कै. वसंतराव देसाई, राजारामबापू देसाई, बळिराम देसाई, काशिनाथअण्णा चराटी, बापूसाहेब धुरे, मुकुंदराव आपटे यांनी रवींद्र आपटे यांची पाठराखण केली. सद्य:स्थितीत वसंतराव धुरे, उदय पवार, अंजनाताई रेडेकर, विष्णुपंत केसरकर, अशोक चराटी यांच्या स्वत:च्या दूध संस्था आहेत. उमेश आपटे हे सतेज पाटील यांना मानणारे असले, तरी राजकीय गुरू म्हणून रवींद्र आपटे यांच्या शब्दाबाहेर जाणारे नाहीत. जयवंतराव शिंपी यांनी गत निवडणुकीत आपटेंबरोबर राहण्याची घेतलेली भूमिका सर्वश्रृत आहे.
आपटे यांनी ‘गोकुळ’ समोर ठेवूनच इतर राजकीय संस्थांचे राजकारण केले. इतर संस्थांमध्ये फारशी कधी ढवळाढवळ केली नाही. ‘रिमोट’ हातात ठेवून हालचाली केल्या, पण गोकुळ व्यतिरिक्त इतर संस्थांत ते थेट उमेदवार म्हणून कधीच दिसले नाहीत. निवडणुकीतील थेट सात वर्षांचे पडलेले अंतरही त्यांना फायद्याचे ठरले आहे.