शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

HSC/12th Exam: अगरबत्ती-कापूर जाळला, नारळ फोडून विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात प्रवेश केला; आजऱ्यात रंगली चर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 18:41 IST

सदाशिव मोरे आजरा : बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण होत चांगले गुण मिळविण्यासाठी अभ्यासाऐवजी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जाते. पेपरमध्ये ...

सदाशिव मोरेआजरा : बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण होत चांगले गुण मिळविण्यासाठी अभ्यासाऐवजी विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी शक्कल लढविली जाते. पेपरमध्ये चलनी नोटा ठेवणे, परीक्षा नंबर लिहीणे, आपण, आई - वडील कॅन्सरने आजारी असल्याचे कारण पेपरमध्ये लिहून सहानुभूती मिळवितात. आज, इंग्रजी पेपरला जाण्यापूर्वी आजऱ्यातील एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याने अगरबत्ती-कापूर जाळून, नारळ फोडून परीक्षा केंद्रात प्रवेश केला. या प्रकाराची चर्चा आजरा शहरासह परिसरात रंगली आहे.परीक्षा केंद्रावर सर्व विद्यार्थ्यांना कॉपी करणार नसल्याची शपथ देण्यात आली. शपथ घेतल्यानंतर संबंधीत विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारात गेला. बाजारातून आणलेली अगरबत्ती लावली, कापूर जाळला व नारळ फोडून मोठ्याने आजचा इंग्रजीचा पेपर सर्वांना सोपा जाऊ दे, सर्वच विषयात सर्वांना चांगली गुण मिळू देत असे गाऱ्हाणे घातले. व नारळाचे भकल ओवाळून दोन्ही बाजूला टाकत परीक्षा केंद्रात प्रवेश केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी गोंधळून गेले. दरम्यान, याठिकाणी असलेल्या काही पालकांनी हा प्रकार थांबविण्याऐवजी हसतमुखाने त्याचे स्वागत केले. तर काही विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करीत मोबाईलवर फोटो काढले. पेपर झाल्यानंतर सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरलही केले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC / 12th Exam12वी परीक्षाStudentविद्यार्थी