शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वर्तकांचे पाटणकरांवरील आरोप बिनबुडाचे

By admin | Updated: November 28, 2015 00:13 IST

संपत देसाई : ...अन्यथा कष्टकरी जनता त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल

आजरा : ‘सनातन’ संस्थेचे डॉ. अभय वर्तक यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्यावर केलेल्या आरोपामुळे वर्तक यांचे राजकीय व सामाजिक अज्ञान स्पष्ट होते. गेली ४० वर्षे डॉ. पाटणकर हे कष्टकरी, श्रमिक जनतेच्या न्यायासाठी पूर्णवेळ आपले आयुष्य झोकून देऊन काम करीत आहेत. अशा वेळी अभय वर्तक यांनी डॉ. पाटणकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा सल्ला श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांनी येथे पत्रकार बैठकीत बोलताना दिला.कॉ. देसाई म्हणाले, जलसिंचन घोटाळ्याबाबत डॉ. पाटणकर गप्प का बसले असे म्हणणाऱ्या वर्तकांनी डॉ. पाटणकरांच्या नेतृत्वाखाली २०१३-१४ मध्ये लोकाभिमुख पाणी धोरण मंचच्या माध्यमातून झालेली आंदोलने पहावीत. पाण्याची चोरी करणाऱ्या आणि सिंचन घोटाळा करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर एकाचवेळी अनेक जिल्ह्यांत मोर्चे निघाले होते. पुणे येथे श्रमिक मुक्ती दलाच्या पुढाकाराने सर्व संघटनांना एकत्र करून संघर्ष परिषद घेण्यात आली होती.सन २०१४ मध्ये आझाद मैदान मुंबई येथे हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने धरणे आंदोलने प्रा. डॉ. एन. डी. पाटील व डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. त्यावेळी अभय वर्तक आणि त्यांची सनातन संस्था कुठे होती, असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थित केला.मदरशांचे कोम्बिंग आॅपरेशन करा, असे पाटणकर का म्हणत नाहीत असे म्हणणाऱ्या वर्तक यांनी पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील सर्व मदरशांच्या मौलानांना सोबत घेऊन ज्यांना मदरशांविषयी संशय वाटतो त्यांनी मदरशांमध्ये यावे आणि मदरसे तपासावेत, अशी मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाचा मोर्चा काढला होता हे वर्तक यांनी समजून घ्यावे.पाटणकर आणि दाभोलकर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याच्या वर्तक यांच्या सल्ल्याची पोलिसांना गरज नाही. याबाबत निर्णय घेण्यास पोलीस खाते सक्षम आहे.पोलीस आणि समाजाला गुन्हेगार कोण आहेत याची चांगलीच माहिती आहे. देशातील कष्टकरी व श्रमिक जनतेमध्ये फूट पाडू पाहणाऱ्या वर्तक आणि त्यांच्या सनातन संस्थेने कोणतेही विधान किंवा लिखाण करताना जबाबदारीने करावे. तत्पूर्वी, त्यांचे सामाजिक योगदान आणि कष्टकरी श्रमिकांसाठीचा संघर्षही पहावा; अन्यथा महाराष्ट्रातील कष्टकरी जनता त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)