अक्षय्य तृतीयेला अंबाबाईचा हिंदोळा...; झुल्यावरील सालंकृत पूजा, घरोघरी सणाचा उत्साह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2026 14:55 IST2026-04-20T14:53:37+5:302026-04-20T14:55:09+5:30

वर्षातून एकदा या दिवशी अंबाबाई पानाफुलांनी फळांनी सजलेल्या झुल्यावर विराजमान होते. वनामध्ये हिंदोळ्याचा आनंद घेते.

akshaya tritiya 2026 ambabai salankrit puja festive excitement in every household | अक्षय्य तृतीयेला अंबाबाईचा हिंदोळा...; झुल्यावरील सालंकृत पूजा, घरोघरी सणाचा उत्साह

अक्षय्य तृतीयेला अंबाबाईचा हिंदोळा...; झुल्यावरील सालंकृत पूजा, घरोघरी सणाचा उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेला करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या उत्सवमूर्तीची झुल्यावरील सालंकृत पूजा बांधण्यात आली. वर्षातून एकदा या दिवशी अंबाबाई पानाफुलांनी फळांनी सजलेल्या झुल्यावर विराजमान होते. वनामध्ये हिंदोळ्याचा आनंद घेते.

वर्षातील साडेतीन मुहूर्तामध्ये अक्षय्य तृतीया हा अर्धा मुहूर्त आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय होत नाही. कुटुंबातील सुख-समृद्धी वृद्धिंगत होत राहते. यादिवशी केलेले कोणतेही शुभकार्य घराला लाभदायक असते, अशी श्रद्धा आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाई यादिवशी वर्षातून एकदा झुल्यावर बसून हिंदोळ्याचा आनंद घेते. 

यानिमित्त अंबाबाईची पहाटे काकड आरती, अभिषेक, दुपारची आरती - झाल्यानंतर मूळ मूर्तीची सालंकृत पूजा बांधण्यात आली. त्यानंतर दुपारी मंदिर आवारातील गरूड मंडपात पानाफुलांनी फळांनी झुला सजवण्यात आला. या झुल्यावर अंबाबाईची काठापदराची साडी आणि रत्नजडित अलंकारांनी सजलेली उत्सवमूर्ती विराजमान झाली. देवीची पूजा झाल्यानंतर चोपदारांनी देवीचा झुला झुलवला. फळांचा राजा असलेल्या आंब्याचे यादिवशी घराघरांमध्ये आगमन होते. 

रविवार.. अक्षयतृतीयेचा योग मंदिरात गर्दी

वर्षातून एकदाच बांधली जाणारी झुल्यावरील पूजा पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती. आता उन्हाळ्याच्या सुट्या सुरू झाल्याने मंदिरात इतर दिवशीदेखील गर्दी असते. त्यात रविवारी सुटीच्या दिवशीच अक्षयतृतीयेचा योग आल्याने या योगावर अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
 

Web Title : अक्षय तृतीया: अंबाबाई का झूला सजा; घरों में उत्सव का माहौल।

Web Summary : अक्षय तृतीया पर, अंबाबाई की मूर्ति को फूलों और फलों से सजे झूले पर रखा गया, जो साल में एक बार मनाई जाने वाली परंपरा है। इस विशेष अवसर पर भक्तों ने मंदिर में भारी भीड़ की, जो समृद्धि और शुभ शुरुआत का प्रतीक है। घरों में आमों का स्वागत किया गया, जो मौसम की समृद्धि का प्रतीक है।

Web Title : Akshay Tritiya: Ambabai's swing adorned; festive fervor in homes.

Web Summary : On Akshay Tritiya, Ambabai's idol was placed on a swing, adorned with flowers and fruits, a tradition observed once a year. Devotees thronged the temple for this special occasion, marking a time for prosperity and auspicious beginnings. Homes welcomed mangoes, symbolizing the season's bounty.