शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीनंतर ८७ व्या वर्षी एलएल. बीचे स्वप्न पूर्ण

By admin | Updated: August 20, 2014 00:55 IST

जिद्दी आजोबांचे नाव आहे - गोविंदराव ऊर्फ बाबूराव परुळेकर!

गोविंद परुळेकर; निवृत्तीनंतर केले स्वप्न पूर्ण कोल्हापूर : ‘डोळ्यांना कमी दिसतंय, कंबर दुखतेय, पायांत ताकद नाही, अंग थरथरतंय, अंगात अशक्तपणा आहे, मधुमेह आहे,’ असं म्हणायचं खरं तर त्यांचं वय; परंतु यातील कोणतंही दुखणं त्यांना नाही. घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे ऐन तारुण्यात वकील होता आले नाही, याचं शल्य मात्र आयुष्यभर त्यांच्या मनाला बोचत राहिलं. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वकील होण्याचा मनात घाट घातला आणि आश्चर्य काय तर तब्बल ८७व्या वर्षी त्यांनी मनातील जिद्द पूर्ण केली. एलएल.बी.ची परीक्षा ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. या जिद्दी आजोबांचे नाव आहे - गोविंदराव ऊर्फ बाबूराव परुळेकर! मूळचे आजरा येथील रहिवासी असलेल्या गोविंदराव परुळेकर यांना घरच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेता आले. मॅट्रिक्युलेट झाल्यानंतर त्यांना न्यायालयात नोकरी मिळाली. नोकरी करीत-करीत त्यांनी सुपरिंटेंडेंट पदापर्यंत मजल मारली. ३६ वर्षांच्या सेवेनंतर १९८६ मध्ये गोविंदराव सेवानिवृत्त झाले. दरम्यान, त्यांची मुले, नातवंडे उच्चशिक्षित झाली. वकील होण्याचे स्वप्न आणि त्यातच घराण्यात केवळ आपणच कमी शिकलेलो याचे शल्य गोविंदरावांना बोचायला लागले. गोविंदरावांनी ७८व्या वर्षी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून इंग्रजी, समाजशास्त्र व मानसशास्त्र हे विषय घेऊन बी. ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तरुण विद्यार्थ्यांच्या वर्गात बसून दरवर्षी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांना मिळाला. विशेष म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात ते सोमवार ते शनिवार कुडाळ येथे राहून शनिवारी दुपारी अ‍ॅक्टिव्हा गाडी स्वत: चालवीत आजरा येथे गावी येत असत. आपल्या गावी निगराणी ठेवून पुन्हा रविवारी सायंकाळी ते कुडाळला जात.