शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीनंतरच शहराची हद्दवाढी

By admin | Updated: April 5, 2015 00:27 IST

प्रशासन गतिमान : एप्रिल मध्ये पाठविणार अहवाल

 कोल्हापूर : महापालिकेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीपूर्वी हद्दवाढीचा निर्णय घेतल्यास सध्याच्या सभागृहास किमान एक वर्षाची पुढे संधी मिळणार आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरच पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या चार-पाच गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्याचा मानस राज्य शासनाचा असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. महापालिका हद्दवाढीतील प्रस्तावित १७ गावांची बैठक घेऊन भूमिका समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यानंतरच याबाबतचा सविस्तर अहवाल ३० एप्रिलपर्यंत शासनास सादर होण्याची शक्यता आहे. हद्दवाढीसाठी प्रशासन प्रयत्न करीत असतानाच नगरसेवक मात्र, महापौर हटाव व येणाऱ्या निवडणुका यातच दंग असल्याचे चित्र आहे. ‘राजकीय विरोधामुळे कोल्हापूरची हद्दवाढ नाकारण्यात येत आहे,’ असे दोन ओळींचे पत्र लिहून राज्य शासनाने कोल्हापूरची हद्दवाढ नाकारली. याप्रश्नी उच्च न्यायालयाने राज्य शासनास निर्णय घेण्याची दिलेली मुदत ओलांडून गेल्याने अवमान याचिकेच्या भीतीने राज्य शासनाने हद्दवाढप्रश्नी तातडीने निर्णय घेतला. दरम्यान, महापालिकेची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. हद्दवाढीची घोषणा केल्यास नियमाप्रमाणे सभागृहास सहा महिने ते दीड वर्षापर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ही टाळण्यासाठीच शासनाने राजकीय हेतूने हद्दवाढीचा प्रश्न सध्या बासनात गुंडाळल्याची चर्चा आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हद्दवाढीसाठी प्रस्तावित गावांतील प्रमुखांची बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. या बैठकीच्या अनुषंगाने प्रशासन एप्रिल महिनाअखेरीस शासनास हद्दवाढीचा पुनर्विचार करण्याबाबत प्रस्ताव पाठविणार आहे. हद्दवाढीसाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. याउलट नगरसेवक महापौर हटाव मोहिमेत गुंतल्याचे चित्र आहे. प्रशासनास राजकीय पाठबळ मिळत नसल्याने हद्दवाढीचा प्रश्न कासवगतीने वाटचाल करीत असल्याची खंत याप्रश्नी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेले माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)