शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेतात वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:09 IST

पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे आठवड्यातील दुसरी घटना

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथे शेतात वैरणीसाठी गेलेल्या तरुणावर गव्याने हल्ला केला. हल्ल्यात संदीप दिनकर काटकर हे गंभीर जखमी झाले. ही घटना आज, सोमवार (दि.१७) सकाळच्या सुमारास घडली.संदीप काटकर हे सकाळी युवराज विठ्ठल काटकर यांच्या बारथळ नावाच्या शेतातील बांधावरील गाजर गवत कापण्यासाठी गेले होते. यावेळी ऊसात दबा धरून बसलेल्या गव्याने त्याच्यावर हल्ला केला. गव्याचे शिंग पोटात, डाव्या बाजूला बरकडी खुसले. छातीला मार लागल्याने काटकर गंभीर जखमी झाले. यावेळी जवळच नांगरटीसाठी आलेले अमोल जाधव व  सखाराम म्हेतर यांना ओरडण्याचा आवाज आला. घटनास्थळी त्यांनी धाव घेतली असता काटकर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. जाधव, म्हेतर यांनी त्यांना बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून तेथे प्राथमिक उपचार करून कोल्हापूरला खासगी दवाखान्यात दाखल केले.आठवड्यातील दुसरी घटना..गुरुवारी (दि.१३) काळजवडे (ता. पन्हाळा) येथील २३ वर्षीय अजिंक्य दादू पाटील या तरुणाला सुंभेवाडी येथे सकाळी शेतीच्या कामानिमित्त गेला असता गवा रेड्याने जखमी केले होते. अजून तो दवाखान्यात असताना दुसरी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Youth attacked by gaur while foraging, seriously injured.

Web Summary : A youth in Kolhapur's Panhala was severely injured by a gaur while collecting fodder. Sandeep Katkar sustained injuries to his abdomen and chest. He was rescued by locals and admitted to a Kolhapur hospital. This is the second gaur attack in the area this week, creating fear among residents.