शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात नगरपालिका, नगरपंचायतींसाठी ५०४ अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 12:08 IST

Local Body Election: एकमेकांचा राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी माघारीपर्यंत अनेक उलाढाली होणार

कोल्हापूर : जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी मोठ्या संख्येने म्हणजे ५०४ अर्ज दाखल झाले; तर नगराध्यक्षपदासाठी ३६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आजपर्यंत एकूण १२२७ जणांनी नगरसेवकपदासाठी, तर नगराध्यक्षपदासाठी एकूण ९६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. आज, सोमवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.जिल्ह्यातील १० नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींची निवडणूक लागली असून राजकीय आघाड्याही अंतिम टप्प्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी महायुतीमध्ये फूट पडली असून महाविकास आघाडीही काही ठिकाणी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे अतिशय अटीतटीच्या होणाऱ्या या निवडणुकांसाठी इच्छुकांचीही संख्या वाढली आहे. एक तर राज्यात चार पक्षांचे सहा पक्ष झाल्याने आणि स्थानिक राजकारणात उतरण्याची इच्छा असलेल्या युवकांचीही मोठी संख्या असल्याने अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गट, काॅंग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, उद्धवसेना, जनसुराज्य पक्ष, स्वाभिमानी पक्ष प्रामु्ख्याने सक्रिय असून आता या निवडणुकांमध्ये पक्षीय भेद न पाळता काही ठिकाणी स्थानिक आघाड्याही आकाराला आल्या आहेत.

रविवारी अर्ज दाखल केलेली संख्या एकूण अर्जनगरपालिका - सदस्यपदासाठी अर्ज - अध्यक्षपदासाठी अर्ज

  • जयसिंगपूर - ५३ (१२३) - २ (८)
  • मुरगूड - ४८ (१९२) - १ (१२)
  • कागल - ४६ (१८८) - ५ (१२)
  • शिरोळ - ४१ (७८) - ४ (५)
  • गडहिंग्लज - ४० (९६) - ४ (१२)
  • हुपरी - ४० (४२) - ०० (००)
  • कुरुंदवाड - ३६ (९३) - १ (८)
  • पन्हाळा - ३३ (५३) - ४ (५)
  • वडगाव - ३१ (४२) - ४ (५)
  • मलकापूर - १८ (५८) - १ (४)

नगरपंचायत

  • आजरा - ४५ (९९) - ४ (१३)
  • चंदगड - ४२ (८८) - ६ (८)
  • हातकणंगले - ३१ (७५) - ०० (०४)

नेतेमंडळींची धावपळअर्ज दाखल करण्याचा आज, सोमवार शेवटचा दिवस असल्याने नेतेमंडळींचीही धावपळ सुरू आहे. एकमेकांचा राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी माघारीपर्यंत अनेक उलाढाली होणार असल्याने अर्ज भरून ठेवा अशा सूचना नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : 504 applications filed for Kolhapur Municipal elections; today is the deadline.

Web Summary : Kolhapur saw 504 applications for municipal elections on deadline eve. Coalition fractures and local alliances mark the competitive polls. Today is the final day for filing nominations.