कोल्हापूर: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीच्या अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी पार पडली. जिल्हा परिषदेच्या २३ आणि पंचायत समितीच्या ४४ अशा एकूण ६७ उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी ६५९ आणि पंचायत समितीसाठी १२११ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मंगळवारी दि. २७ जानेवारीअखेर माघारीची मुदत असून आता माघारीसाठीच्या राजकीय जोडण्यांना सुरुवात झाली आहे.
या निवडणुकांसाठी बुधवारी प्रचंड संख्येने अर्ज दाखल झाले, तर गुरुवारी बाराही तालुक्यांत छाननी प्रक्रिया सुरळीत पार पडली. काही ठिकाणी शाब्दिक वाद झाले. आजरा तालुक्यातील वाटंगी गणातून बाजार समितीचे माजी सभापती राजाराम पोतनीस आणि भादवण गणातून स्वप्नाली केसरकर या दोघांचे अर्ज अपात्र ठरले.
जातीच्या दाखल्याचे टोकन न जोडल्याने शिरोळ तालुक्यातून जिल्हा परिषदेचे अपक्ष उमेदवार भाग्यश्री कोळी, जरीना सुतार, चंद्रकांत चव्हाण यांचे अर्ज अपात्र ठरले. हातकणंगले तालुक्यातील छाननी प्रक्रियेतील काही अर्जांबाबत वकिलांच्या हरकतीवर आज शुक्रवारी निर्णय देण्यात येणार आहे.
जात पडताळणी नसल्याने राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील श्रीकांत चव्हाण यांचा अर्ज छाननीत बाद झाला. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर वारूण गटातून संभाजी कांबळे यांचा अर्ज अवैध ठरला.
तालुका पात्र जिल्हा परिषद उमेदवार पात्र पंचायत समिती उमेदवार
शाहूवाडी २१/३९
पन्हाळा ५९/८३
हातकणंगले ९८/१६४
शिरोळ ७७/१०२
करवीर १२६/१९४
गगनबावडा ११/१७
राधानगरी ७२/१४२
कागल ५४/१३०
भुदरगड ४५/११५
आजरा १६/३५
गडहिंग्लज ५४/१०६
चंदगड २६/८४
एकूण ६५९/१२११
Web Summary : 1870 candidates qualified for Kolhapur Zilla Parishad & Panchayat Samiti elections. 67 applications rejected after scrutiny. Withdrawal period begins; political maneuvering intensifies.
Web Summary : कोल्हापुर जिला परिषद और पंचायत समिति चुनावों के लिए 1870 उम्मीदवार योग्य। जांच के बाद 67 आवेदन खारिज। नाम वापसी की अवधि शुरू; राजनीतिक जोड़तोड़ तेज।