शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१३ जागांसाठी १७ उमेदवार रिगणात

By admin | Updated: January 13, 2015 00:49 IST

पंचगंगा साखर कारखाना निवडणूक : ‘ब’ वर्ग संस्था गटातून बंडा माने बिनविरोध

इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज, अंतिम दिवशी उत्पादक गटातील १२ जागांसाठी १७ उमेदवार व ‘ब’ वर्ग अनुत्पादक व्यक्ती गटाच्या जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. परिणामी दोन्ही गटांच्या निवडणुकीसाठी २४ जानेवारीला मतदान होणार आहे.
‘ब’ वर्ग अनुत्पादक संस्था गटामध्ये बंडा आप्पा माने यांचा एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे माने यांची निवड बिनविरोध झाली. या गटातून पी. एम. पाटील यांनी माघार घेतली. ‘अ’ वर्ग उत्पादक गटात विद्यमान अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांमध्ये अध्यक्ष पाटील (कबनूर), कुमार खूळ (रुई), धनगोंडा पाटील (कोथळी), जयपाल कुंभोजे (गौरवाड), एम. आर. पाटील (लाट), जिवनधर पाटील (बोरगाव), कल्लू पिराई (पट्टणकोडोली), सुनील तोरगल (सदलगा) हे सर्व विद्यमान संचालक, रावसाहेब भगाटे (नांदणी), प्रताप नाईक (घालवाड), लक्ष्मण निंबाळकर (हेर्ले) व राजगोंडा पाटील (टाकवडे) या नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. याच गटात विरोधी मगदूम गटातून माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम (निमशिरगाव), रमेश चौगुले (चिंचवाड), बाबूराव सादळकर (ढोणेवाडी), नारायण कांबळे (शिरदवाड) व सातगोंडा पाटील (जांभळी) हे निवडणूक लढवीत आहेत.
‘ब’ वर्ग व्यक्ती गटात पाटील पॅनेलचे दिलीप महाजन (माणगाव) विरुद्ध मगदूम गटाचे सुकुमार गडगे (इचलकरंजी) यांच्यात लढत होईल. ‘अ’ वर्ग व ‘ब’ वर्ग अशा स्वतंत्र मतदान पत्रिका असून, कारखाना कार्यस्थळावर रत्नदीप हायस्कूलमध्ये २९ मतदान केंद्रांवर २४ जानेवारीला मतदान होईल, तर २५ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी डॉ. महेश कदम व सहायक निवडणूक अधिकारी सुनील धायगुडे यांनी दिली. बहुराज्य सहकार कायद्याप्रमाणे निवडणुकीची घोषणा उद्या, बुधवारी होणाऱ्या सभेत करण्यात येईल. (प्रतिनिधी)

समझोत्याचा प्रयत्न निष्फळ
पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता सत्तारूढ पाटील पॅनेलकडून चिकाटीने प्रयत्न करण्यात आले. कोल्हापूर येथील एका विद्यमान आमदाराचा ‘विरोधी मगदूम गटाबरोबर समझोता करा’, असा निरोप सत्तारुढांना आल्याने उमेदवारी माघार घेण्याची मुदत तीन वाजता संपली असली, तरी सायंकाळी सहा वाजेपर्यंत केलेले प्रयत्न हेकेखोरपणामुळे निष्फळ ठरले.