शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१७ अधिकाऱ्यांना दिलासा

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

मनपा भरती : कर्मचारी संघटनेची न्यायालयातून माघार; पडद्यामागे घडल्या घडामोडी

कोल्हापूर : औद्योगिक न्यायालयाने महापालिकेने १५ एप्रिल २००२ ला सरळ सेवा भरतीद्वारे केलेल्या १७ अधिकाऱ्यांना ‘घरचा रस्ता’ दाखविण्याचे आदेश दिले. त्यानंतर ‘त्या’ अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आदेशाला स्थगिती मिळविली. याबाबत आज, सोमवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान तक्रारदार कर्मचारी संघटनेने माघार पत्र सादर केले. संपूर्ण प्रकरणालाच आता कलाटणी मिळणार असल्याने अधिकाऱ्यांनी सुस्कारा टाकला.
महापालिकेने २००२ मध्ये आदेशाद्वारे २४ अधिकाऱ्यांची सरळ सेवेद्वारे भरती केली होती. त्यामध्ये मुख्य लेखपाल संजय सरनाईक, दिवाकर कारंडे, शर्मिली भांडवले, प्रशांत पंडत, सचिन जाधव, उमाकांत कांबळे, विलास साळोखे आदींचा समावेश आहे. २४ पैकी तीन अधिकारी मयत आहेत तर चार लोक हजरच झाले नाहीत.
कर्मचारी संघटनेने या अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला आव्हान देत औद्योगिक न्यायालयातून सेवा संपुष्टात आणण्याचा आदेश आणला. त्यास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती आदेश दिले असले तरी, त्यामुळे सेवेत असलेल्या १७ अधिकाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता.
थेट वरिष्ठ लिपिक किंवा अधीक्षक पदावर हे कर्मचारी रूजू झाले होते. सध्या यातील बहुतांश कर्मचारी आता ‘प्रभारी अधिकारी’ म्हणून कित्येक वर्षे सेवा बजावत आहेत.
कर निर्धारण व संग्राहक अधिकारी, विधि विभागप्रमुख, पाणीपट्टी अधीक्षक, पवडी लेखपाल, सीएफसी प्रमुख, मुख्य लेखपाल, आदी उच्च पदांवर हे कर्मचारी ‘प्रभारी’ म्हणून आहेत.
औद्योगिक न्यायालयाच्या दणक्याने या प्रभारींत अस्वस्थता पसरली होती. उच्च न्यायालयानेही औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम राखल्यास घरी जाण्याशिवाय या अधिकाऱ्यांसमोर पर्याय नव्हता. तक्रारदार संघटनेने न्यायिक प्रक्रियेतून माघार घेतल्याने या अधिकाऱ्यांची नोकरी कायम राहणार आहे. (प्रतिनिधी)

५हातमिळवणीची चर्चा
महापालिकेत अनेक ज्येष्ठांना डावलून अनेकांची प्रभारीपदी वर्णी लागली. रोस्टरप्रमाणे हक्क असूनही कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. महापालिका कायद्यातील पळवाट शोधत ‘प्रभारी’ झालेले पूर्वी कार्यालयात कनिष्ठ पदांवरच कार्यरत होते. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला कर्मचारी संघटनेने न्यायालयात आव्हान दिले होते. या भरतीमुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याने संघटना न्यायालयात गेली होती. अपेक्षित निकाल टप्प्यात असताना संघटनेच्या नेत्यांनी न्यायालयातून माघार घेतली. या माघारीमागे झालेल्या हातमिळवणीबाबत महापालिकेत जोरदार चर्चा सुरू आहे.