शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील भीमा कृषी प्रदर्शनात १,४०० किलोचा मुरा रेडा, पाच फूट सरड्याची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:09 IST

जातीवंत जनावरे खास आकर्षण, येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार 

कोल्हापूर : कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते भीमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात पहिल्याच दिवशी पाच फुटांचा इग्वाना सरडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा भीमा कृषी व पशू प्रदर्शनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. उदघाटन कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, अरुंधती महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महेश जाधव, अंबरिष घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

खासदार महाडिक म्हणाले, शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान कळावे, त्यांचे उत्पादन वाढावे यासाठी गेल्या १८ वर्षांपासून भीमा कृषी प्रदर्शन भरवत आहे. या माध्यमातून शेती, पशुधन यामधील बारकावे शेतकऱ्यांना समजून घेता येतात. सध्या एआयचे जग आहे. एआयच्या माध्यमातून कृषी मालाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.

रूपाराणी निकम म्हणाल्या, शेतीमधील विविध उपक्रमांची पायाभरणी या प्रदर्शनातून केली जाते. कृष्णराज महाडिक यांनी स्वागत केले. यावेळी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांना पुरस्करांनी गौरवण्यात आले. येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष

कोल्हापूर जिल्ह्याने नगरपालिका, महानगरपालिकेत महायुतीला सत्तेत बसवले आहे. आता जिल्हा परिषदेतही आमचे बहुमत असून महायुतीचाच अध्यक्ष होणार असा दावा खासदार महाडिक यांनी यावेळी केला. बास्केट ब्रिजसह विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे प्रकल्प कोल्हापूरसाठी मंजूर झाले आहेत. हे प्रकल्प कोल्हापूरच्या विकासाला चालना देतील, असेही महाडिक म्हणाले. कोल्हापूर-मिरज रेल्वे दुहेरीकरणासाठीही निधी मंजूर झाला असून यामुळे देशभरातील शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याचे ते म्हणाले.

जातीवंत जनावरे खास आकर्षण

१,४०० किलोचा मुरा रेडा, ३० लीटर दूध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, खास सांगोला, दहिवडीवरून जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी, परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गीर इत्यादी जातीची खोंड, गायी या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Krishi Exhibition: 1400kg Buffalo & Iguana Attract Crowds

Web Summary : Kolhapur's Bhima Krishi exhibition, inaugurated by Mahadevrao Mahadik, features agricultural technology and livestock. A 1400kg Murra buffalo and five-foot iguana are major attractions. The event showcases advancements in farming and animal husbandry, aiming to boost agricultural productivity with modern techniques. It runs until February 16th.