शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘बार्टी’ला पूर्ण फेलोशिप, ‘सारथी’, ‘महाज्योती’ला अर्धी का?; विद्यार्थी संतप्त 

By पोपट केशव पवार | Updated: August 30, 2024 13:30 IST

समान धोरणाला सरकारचाच कोलदांडा

पोपट पवार कोल्हापूर : सामाजिक न्याय विभागाच्या ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती, अधिछात्रवृत्ती यामध्ये समानता आणण्यासाठी सरकारने समान धोरण निश्चित केले खरे; मात्र बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना १०० टक्के फेलोशिप मंजूर करीत सरकारने समान धोरण कागदावरच असल्याचा प्रत्यय दिला आहे. ‘बार्टी’ला पूर्ण फेलोशिप मग ‘सारथी’ व ‘महाज्योती’ला अर्धी का? असा सवाल करत हे विद्यार्थी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था (सारथी) व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या संस्थांमार्फत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात येते. त्यानुसार आलेल्या जाहिरातींनुसार अर्जामधील कागदपत्रांची पडताळणी करून व शपथपत्र घेऊन एकूण ३५४५ संशोधक विद्यार्थ्यांपैकी पात्र संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्के दराने सरसकट अधिछात्रवृत्ती मंजूर केली होती; मात्र आम्हाला शंभर टक्के दराने अधिछात्रवृत्ती द्या, अशी मागणी करत ‘बार्टी’तील संशोधक विद्यार्थ्यांनी गेले १५ दिवस आंदोलन केले.कागदपत्र पडताळणीवर बहिष्कार टाकत आत्मदहन करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर २५ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट शंभर टक्के दराने फेलोशिप मंजूर केली. ‘बार्टी’सह ‘सारथी’ व ‘महाज्योती’मधील विद्यार्थ्यांचीही शंभर टक्के दराने फेलोशिप देण्याची मागणी असताना केवळ ‘बार्टी’चीच मागणी मान्य केल्याने ‘सारथी’ व ‘महाज्योती’चे विद्यार्थी संतप्त झाले आहेत. सरकार विद्यार्थ्यांमध्येही दुजाभाव करत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.

समान धोरण अमलात आणा‘सारथी’ आणि ‘महाज्यो’तीमधील पीएच.डी.च्या संशोधक विद्यार्थ्यांना ५० टक्केच शिष्यवृत्ती मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. सरकारने समान धोरण अमलात आणून सर्वांनाच सरसकट १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

बार्टी संशोधक विद्यार्थ्यांना शंभर टक्के दराने फेलोशिप दिल्याबद्दल सरकारचे आभार; पण सरकारने विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता गेले दीड वर्ष ज्या समान धोरणाची सरकार वल्गना करत होते तेच अमलात आणावे व ‘सारथी’ आणि ‘महाज्योती’मधील संशोधक विद्यार्थ्यांनाही १०० टक्के फेलोशिप द्यावी. - संभाजी खोत, अध्यक्ष सारथी कृती समिती. 

पीएच.डी.ला प्रवेश घेतल्यापासून लढावे लागत आहे. आता पुन्हा तिन्ही संस्थेतल्या भेदभाव करणाऱ्या निर्णयासाठी पुन्हा लढावे लागते. संशोधन करायचं की फक्त लढायचं हेच समजेना. - आयेशा आतार, संशोधक विद्यार्थिनी, महाज्योती.

‘बार्टी’बाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत; पण ‘महाज्योती’ संस्थेतही २०२२ या वर्षातील अर्जदारांची संख्या मोठी आहे. याचा विचार का केला नाही. सर्व पात्र विद्यार्थ्यांना पूर्ण व नोंदणी दिनांकपासून अधिछात्रवृत्ती द्यावी, अन्यथा १ सप्टेंबरपासून आमरण उपोषण सुरू करू. - सद्दाम मुजावर, अध्यक्ष, महाज्योती कृती समिती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी