शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
2
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
3
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
4
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
5
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
6
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
7
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
8
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
9
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
10
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
11
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
12
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
14
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
15
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
16
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
17
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
18
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
19
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
20
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सराफ व्यावसायिकांना तब्बल दहा कोटींचा गंडा

By admin | Updated: January 10, 2015 00:43 IST

गुजरीत अस्वस्थता : संशयित ओसवाल शुक्रवारपासून बेपत्ता

कोल्हापूर : सराफ बाजारपेठेतील मोठी उलाढाल असणाऱ्या १० ते १२ व्यावसायिकांना एका व्यक्तीने १० कोटींचा गंडा घातला असल्याची चर्चा गुजरी सराफ बाजारात सुरू आहे. आनंद ओसवाल असे या गंडा घालणाऱ्याचे नाव असून गेली वीस वर्षे इमानदारीने सराफांकडून सोन्या-चांदीचे दागिने घेऊन त्याची बाहेर राज्यातील गावोगावी विक्री केल्यानंतर संबंधितांचे पैसे चुकते करणारा ओसवाल गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता असल्याने अनेकांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. गुजरी बाजारपेठेत गेल्या सहा महिन्यातील हा दुसरा प्रकार घडल्यामुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मूळचा सातारा जिल्ह्यातील कोरेगावचा रहिवासी असलेला आनंद ओसवाल वीस वर्षांपूर्वी कोल्हापुरात आला. निर्व्यसनी, सज्जन अशी ओळख असलेल्या आनंदचे काही नातेवाईकही कोल्हापुरात राहतात. त्यामुळे आनंदवर कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांचा पटकन विश्वास बसला. सुरुवातीला काही वर्षे नातेवाईकांसोबत भागीदारीत सराफ व्यवसाय केला, परंतु नंतर नातेवाईकांशी न पटल्याने बाजारपेठेतील स्वत:च्या ‘गुडविल’वर त्याने स्वत:च व्यवसाय सुरू केला. सराफाकडून सोने-चांदीचे दागिने घ्यायचे आणि बाहेर राज्यातील गावोगावी त्याची विक्री करून दोन आठवड्यांनी संबंधितांचे पैसे भागवायचे, असे त्याच्या कामाचे स्वरूप होते. त्याच्या प्रामाणिकपणावर शहरातील व्यावसायिकांकडून माल सहज मिळत गेला. त्यात काही लहान व्यापारीही त्याच्याकडे उधारीवर माल देऊ लागले.
काही दिवसांपूर्वी ओसवाल याच्याकडील आठ किलो सोने चोरीस गेल्याची चर्चा होती परंतु त्याने कोणालाही न सांगता व्यवसाय वाढवून एक दिवस सराफांचे देणे भागवू, अशी मनाची तयारी केली होती. त्याचीही चर्चा आता गुजरी बाजारपेठेत सुरू आहे. गेल्या शुक्रवारपासून ओसवाल गायब असून त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. ज्यांनी त्याच्याशी व्यवहार केले आहेत त्यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो झालेला नाही. त्यामुळे तो बेपत्ता असल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्याच्या बेपत्ता होण्याने बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे. आपण फसलो असल्याच्या शक्यतेमुळे व्यावसायिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ओसवाल याने गंडा घातला की अन्य काही घडले आहे, याचे स्पष्टीकरण तो परत आल्याशिवाय होणार नाही. ओसवाल परत येईल, अशी प्रतीक्षा सराफ व्यावसायिकांना आहे. (प्रतिनिधी)