शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 06:44 IST

आगामी निवडणुकीत भाजपला आडवे करून दाखवू : शिंदेसेना; करुन बघा, भाजपची ताकद किती आहे ते कळेल: भाजप

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत युती झाली नाही तर निवडणुकीत भाजपला आडवे करू, अशा शब्दांत शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी मित्रपक्षाला आव्हान दिले, तर युती होती तेव्हा शिंदेसेनेने बंडखोरी केली. युतीचा धर्म पाळला नाही. शिंदेसेनेला युती नको असेल तर त्यांनी उघडपणे सांगावे. मग आम्ही समोरासमोर लढू. निवडणुकीत भाजपच सरस ठरणार. युती तोडा म्हणजे भाजपची ताकद किती आहे ते कळेल, अशा शब्दांत भाजपचे नेते नरेंद्र पवार यांनी मोरे यांना प्रतिआव्हान दिले.

शिंदेसेनेचा नारी शक्ती मेळावा बुधवारी पार पडला. या मेळाव्यात शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख मोरे यांनी युतीबाबत भाष्य केले. नरेंद्र पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. शिवसेनेचे दहा बंडखोर उभे होते. त्यामुळे मागे पवार यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली हे त्यांनी विसरू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांना भेटायचे, त्यांच्याशी गोडगोड बोलायचे आणि शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर शाब्दिक वार करायचे हा दुटप्पी खेळ पवार खेळत असून, शिंदेसेना असे खेळ खेळत नाही, असे मोरे म्हणाले.

कार्यकर्त्यांची भावनाही स्वबळावर लढण्याची

कल्याण डोंबिवलीत स्थानिक पातळीवर शिंदेसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची भावना स्वबळावर निवडणुका लढविण्याची आहे. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य करतात. त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर काय कारवाई करतील, याकडे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक महायुती करून लढवली जाणार, असे सूतोवाच केले होते. त्यांचा उद्देश स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांना ब्रेक लावणे हा होता. मात्र, मोरे आणि पवार यांनी युतीविरोधी सूर लावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena, BJP Challenge Each Other to Break Alliance in Kalyan.

Web Summary : Shinde Sena and BJP leaders in Kalyan-Dombivli challenge each other to break their alliance amid local tensions. Leaders trade barbs, hinting at contesting elections independently despite senior leaders' efforts to maintain unity.
टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेनाkdmcकल्याण डोंबिवली महापालिका