शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री न आल्याने वडवली उड्डाणपुलाचे मनसेने केले लोकार्पण; वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 23:42 IST

११ वर्षांनंतर झाले काम, फाटक बंद झाल्याने वाढणार रेल्वे फेऱ्या

कल्याण : शहाड-आंबिवली दरम्यान वडवली रेल्वे उड्डाणपुलाचे सोमवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणारे लोकार्पण अचानक पुढे ढकलले गेले. मात्र, पालकमंत्र्यांचा कार्यक्रम स्थगित होताच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण करून तो वाहतुकीसाठी खुला केला. पुलावर वाहतूक सुरू होताच मनसे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.  या कार्यक्रमास आ. पाटील यांना निमंत्रित केले होते. ते वेळेवर पोहोचले असता कार्यक्रम स्थगित झाल्याचे त्यांना समजले.

लोकांना पुलासाठी ताटकळत कशाला ठेवायचे, असा विचार करून मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पाटील यांनी पूल वाहतुकीसाठी खुला केला. पाटील म्हणाले, वडवली रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यास महापालिकेस ११ वर्षे लागली. प्रभू रामचंद्र लंकेला गेले तेव्हा रामसेतूसुद्धा लवकर उभा राहिला होता. हा पूल तयार व्हावा याकरिता मनसेचे माजी आ. प्रकाश भोईर यांच्यासह सदस्यांनी पाठपुरावा केला होता. तसेच आंदोलनेही केली होती. पूल तयार झाल्याने रेल्वे फाटक बंद होणार असून रेल्वेच्या फेऱ्या वाढणार आहेत. फाटकामुळे रेल्वे गाड्यांना होणारा विलंब टळणार आहे. पुलाचे लोकार्पण न लांबवता तो खुला केला आहे. पुलाच्या पायाभरणीपासून त्याच्या पूर्णत्वापर्यंत इव्हेंट करण्याची सवय सत्ताधाऱ्यांना लागली आहे, अशी टीका त्यांनी केली.

कल्याण-मुरबाड रोडवरील वालधुनी नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्याचेही लोकार्पण सोमवारी होणार होते. मात्र, वडवली पुलाचे मनसेने परस्पर लोकार्पण केल्याची माहिती पोलिसांना मिळताच तत्काळ वालधुनी पुलावर बॅरेकेड लावले व पोलिसाची गाडी आडवी उभी केली. त्यामुळे मनसे आमदारांना वालधुनी पूल वाहतुकीसाठी खुला करता आला नाही. पाटील हे या पुलावरून केवळ चालत गेले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदेRaju Patilराजू पाटील