केडीएमसीचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात, ना हरकत दाखल्यासाठी ४० हजार घेताना पकडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 21:29 IST2026-04-30T21:27:59+5:302026-04-30T21:29:23+5:30

लिपीक पाटोळाला शाळेच्या व्यक्तीकडून ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे.

KDMC clerk caught by ACB, caught taking Rs 40000 for no objection certificate | केडीएमसीचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात, ना हरकत दाखल्यासाठी ४० हजार घेताना पकडला

केडीएमसीचा लिपीक एसीबीच्या जाळ्यात, ना हरकत दाखल्यासाठी ४० हजार घेताना पकडला

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असलेला लिपिक भारत पाटोळे याने एका शाळेला अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला देण्याच्या बदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. शाळेने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. लिपीक पाटोळाला शाळेच्या व्यक्तीकडून ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली आहे.

साई इंग्लिश स्कूलला अग्नीशमन दलाचा ना हरकत दाखला हवा होता. त्या बदल्यात लिपीक पाटोळे याने शाळेकडे ४० हजार रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी शाळेने लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. प्राप्त तक्रारीनुसार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला होता. त्यानुसार पाटोळे याला खडकपाडा परिसरात बोलविण्यात आले. ४० हजार रुपयांची लाच स्विकारताना पाटोळे याला रंगेहाथ पकडले आहे. पाटोळे हा सध्या महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत असला तरी तो या पूर्वी अग्नीशन विभागात कार्यरत होता.

महापालिका भ्रष्टाचारासाठी बदनाम आहे. आत्तापर्यंत महापालिकेतील ४९ अधिकारी कर्मचारी लाच घेताना अटक करण्यात आलेले आहे. अटकेनंतर भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना निलंबित केले जाते. निलंबनाची कारवाई संपुष्टात आल्यावर भ्रष्ट अधिकारी कर्मचारी यांना पुन्हा महापालिकेतील सेवेत घेतले जाते. सुरुवातीला अशासकीय कामकाज दिले जाते. त्यानंतर पुन्हा हे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी शासकीय कामकाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन भ्रष्टाचार करण्यासाठी मोकळे
होते.
 

Web Title: KDMC clerk caught by ACB, caught taking Rs 40000 for no objection certificate