आगरी-कोळी भवनाचे डिसेंबरमध्ये भूमिपूजन; मनसे आमदार राजू पाटील यांचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 12:44 AM2020-12-01T00:44:30+5:302020-12-01T00:44:46+5:30

आगरी साहित्यिकांनी घेतली भेट, या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी पुढील आवाहन आणि मागणी केली. 

Bhumi Pujan of Agari-Koli Bhavan in December; Assurance of MNS MLA Raju Patil | आगरी-कोळी भवनाचे डिसेंबरमध्ये भूमिपूजन; मनसे आमदार राजू पाटील यांचं आश्वासन

आगरी-कोळी भवनाचे डिसेंबरमध्ये भूमिपूजन; मनसे आमदार राजू पाटील यांचं आश्वासन

Next

ठाणे / कल्याण : महाराष्ट्रातील बोलीभाषा संवर्धनासाठी आपण सोबत प्रयत्न करू, असे आश्वासन देऊन येत्या १९ डिसेंबर रोजी ते डोंबिवली येथील ‘आगरी-कोळी आणि वारकरी’ भवनाचे भूमिपूजन करणार असल्याचे तसेच त्यात १०० टक्के आगरी-कोळी बोली आणि तिचे साहित्य जतन संवर्धनासाठी प्रयत्न करू, असेही आश्वासन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आगरी साहित्यिकांना दिले.

ठाण्याची मूळ बोली आगरी-कोळी भाषा आणि तिचे साहित्य जतन-संवर्धनात पुढाकार घेत असलेले युवा साहित्यिक सर्वेश तरे, चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील, गीतकार-गायक दया नाईक यांनी मनसेचे आ. राजू पाटील यांना आगरी-कोळी बोलीला राजाश्रय मिळावा, यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन पत्र दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले. या पत्रात त्यांनी आगरी-कोळी बोली इतर बोलींसारखी लुप्त न होण्यासाठी पुढील आवाहन आणि मागणी केली. 

त्यांनी म्हटले आहे की, आगरी-कोळी बोली, संस्कृती जतन-संवर्धनार्थ ‘आगरी-कोळी भवन’ वा ‘आगरी-कोळी भाषा दालन’ व्हावे, आगरी-कोळी बोलीतील साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाच्या माध्यमातून शिबिरे राबविणे, बोलीभाषा प्रसार-संवर्धनासाठी जिल्हास्तरीय संशोधन केंद्रे निर्माण करणे, नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आगरी-कोळी भाषा आणि तिचे दुर्मीळ साहित्य ‘ग्लोबल’ करणे, सोबतच महाराष्ट्र राज्य सरकारचे २०१४ चे भाषाविषयक धोरण बोलीभाषेचे संवर्धन करणे, लोकगीत, लोककला, लोककथा संकलन-प्रसिद्ध करणे. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी बोलींचे शब्दकोश तयार करणे, बोलींचा अभ्यास, संकलन आणि संशोधन करण्यासाठी यंत्रणा उभारावी, या मागण्या केल्या.

Web Title: Bhumi Pujan of Agari-Koli Bhavan in December; Assurance of MNS MLA Raju Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MNSमनसे