खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 05:59 IST2026-04-16T05:59:07+5:302026-04-16T05:59:50+5:30

Raghav Chadha News: आम आदमी पार्टी (आप) व खासदार राघव चड्ढा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, पंजाब सरकारने त्यांची 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. चड्ढा यांना राज्यसभा उपनेते पदावरून हटवल्यानंतर काही दिवसांतच ही कारवाई करण्यात आली आहे.

MP Raghav Chadha's 'Z Plus' security removed | खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली

खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली

चंडीगड - आम आदमी पार्टी (आप) व खासदार राघव चड्ढा यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, पंजाब सरकारने त्यांची 'झेड प्लस' श्रेणीची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे. चड्ढा यांना राज्यसभा उपनेते पदावरून हटवल्यानंतर काही दिवसांतच ही कारवाई करण्यात आली आहे.

राज्यसभेत राघव चड्ढा यांच्या जागी अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यापासून पक्षात तणाव निर्माण झाला आहे. आपल्याला "शांत केले गेले आहे, हरवले नाही," असे विधान चड्ढा यांनी केले होते. यावर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “चड्ढा पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावे वगळण्याच्या मुद्द्यावर बोलणार नसतील, महत्त्वाच्या मुद्द्यांवर सभागृहात सभात्याग करीत नसतील किंवा गुजरातमध्ये आप नेते- कार्यकर्त्यांच्या अटकेविरोधात आवाज उठवत नसतील, तर ते पक्षाच्या भूमिकेचे उल्लंघन करीत आहेत”, असे मान म्हणाले.

Web Title : आप में तनाव के बीच राघव चड्ढा की 'जेड प्लस' सुरक्षा हटी

Web Summary : राज्यसभा के उपनेता पद से हटाए जाने के बाद पंजाब सरकार ने राघव चड्ढा की 'जेड प्लस' सुरक्षा वापस ले ली। अशोक मित्तल की नियुक्ति के बाद आप में तनाव बढ़ गया। मुख्यमंत्री भगवंत मान ने चड्ढा द्वारा पार्टी के रुख की कथित अवहेलना पर नाराजगी व्यक्त की।

Web Title : Raghav Chadha Loses 'Z Plus' Security Amid AAP Tension

Web Summary : Punjab government withdrew Raghav Chadha's 'Z Plus' security after his removal as Rajya Sabha deputy leader. Tensions within AAP escalated following Ashok Mittal's appointment. Chief Minister Bhagwant Mann expressed displeasure over Chadha's alleged defiance of party stances on key issues.