लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 06:44 IST2026-04-16T06:42:05+5:302026-04-16T06:44:12+5:30

Lebanon and Israel Peace talks: इस्रायल आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेशी गेल्या महिनाभराहून अधिक काळ चाललेल्या युद्धानंतर अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये लेबनॉन आणि इस्रायल यांनी अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच थेट राजनैतिक चर्चा केली.

Peace talks between Lebanon and Israel after 40 years, US clarifies that no agreement has been reached between the two countries yet | लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट

लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट

बैरुत -  इस्रायल आणि इराणचा पाठिंबा असलेल्या हिज्बुल्ला या दहशतवादी संघटनेशी गेल्या महिनाभराहून अधिक काळ चाललेल्या युद्धानंतर अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये लेबनॉन आणि इस्रायल यांनी अनेक दशकांनंतर पहिल्यांदाच थेट राजनैतिक चर्चा केली. ही घटना अतिशय महत्त्वाची असून, दोन्ही बाजूंमध्ये लगेचच कोणताही मोठा करार होणार नाही, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले की, इस्रायल व लेबनॉन यांच्यात थेट चर्चेची प्रक्रिया होण्यासाठी सकारात्मक गोष्टी घडल्या. हिज्बुल्लाने या चर्चेला विरोध करत सहभाग घेतला नाही. चर्चा सुरू होताच हिज्बुल्लाने इस्रायलवर हल्ले वाढवले. लेबनॉनमधून हिज्बुल्लाचा नायनाट झाला पाहिजे, असे मत असल्याचे इस्रायलनेही म्हटले आहे. 

१९९३ नंतर थेट चर्चा  
१९९३नंतर इस्रायल आणि लेबनॉन यांच्यातील ही पहिली थेट चर्चा आहे. यापूर्वी दोन्ही देशांमध्ये अमेरिका किंवा संयुक्त राष्ट्रांच्या यूएनआयएफआयएल मिशनच्या माध्यमातून अप्रत्यक्ष संवाद होत होता.

हल्ल्यात लेबनॉनमधील १६८ मुलांचा मृत्यू
इस्रायलने लेबनाॅनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये लहान मुलांचा मृत्यू होत असून, त्याबद्दल अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांत आतापर्यंत १६८ मुले ठार झाली आहेत. त्यात जवाद, त्याच्या चुलत भावाचाही समावेश आहे.
आम्ही हिज्बुल्लाच्या तळावर हल्ले चढवितो, नागरी वस्त्यांना आम्ही लक्ष्य करत नाही, असे इस्रायलने म्हटले आहे. पण, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे लेबनॉनमधील लहान मुलांचाही मृत्यू होत आहे, असा आरोप होत आहे. मात्र, आम्ही हिज्बुल्लाच्या शेकडो दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा इस्रायलने केला आहे. 

Web Title : लेबनान, इस्राइल में 40 साल बाद शांति वार्ता; अभी तक कोई समझौता नहीं।

Web Summary : दशकों बाद, लेबनान और इस्राइल ने अमरीका की मध्यस्थता में दुर्लभ वार्ता की। तत्काल कोई समझौता अपेक्षित नहीं है। हिजबुल्लाह ने वार्ता का विरोध किया और हमले बढ़ा दिए। इस्राइल का दावा है कि वह हिजबुल्लाह के ठिकानों को निशाना बनाता है, नागरिकों को नहीं, बावजूद इसके बच्चों की मौतें हुई हैं। 1993 के बाद यह पहली सीधी वार्ता है।

Web Title : Lebanon, Israel in peace talks after 40 years; no deal yet.

Web Summary : After decades, Lebanon and Israel held rare US-brokered talks. No immediate deal is expected. Hezbollah opposed the talks and increased attacks. Israel claims it targets Hezbollah bases, not civilians, despite child casualties. The talks are the first direct ones since 1993.