अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 08:27 IST2026-04-16T08:26:59+5:302026-04-16T08:27:20+5:30

Parthwada, Amravati Video scandal : परतवाडा येथे उघड झालेल्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आता थरकाप उडवणारे वास्तव समोर आले आहे. 

Video scandal in Parthwada, Amravati: Two girls sexually abused in friend's room | अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण

अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण

अमरावती  -  परतवाडा येथे उघड झालेल्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आता थरकाप उडवणारे वास्तव समोर आले आहे. आरोपींनी केवळ व्हिडिओ व्हायरल केले नसून, दोन पीडित मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. मुख्य आरोपी अयान अहमद याने अमरावती शहरातील आपल्या एका मित्राची रूम काही तासांसाठी भाड्याने घेऊन तिथे या मुलींवर अत्याचार केल्याची कबुली  दिली आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अयान अहमद तनवीर अहमद (१९, रा. परतवाडा) याच्या अटकेनंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. अयानने पोलिसांना दिलेल्या कबुलीत म्हटले आहे की, त्याने अमरावती येथील एका मित्राच्या भाड्याच्या खोलीवर नेऊन दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. 

या कामासाठी तो मित्र अयानला काही तासांसाठी आपली खोली उपलब्ध करून देत असे. पोलिसांनी या रूम मालक मित्रालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पीडित मुली अद्याप समोर आल्या नसल्या तरी तांत्रिक पुराव्यांवरून या अत्याचाराची पुष्टी झाली आहे. 
 
४५ सदस्यांची एसआयटी 
आरोपींनी पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकरणी ४५ सदस्यीय विशेष चौकशी समिती गठित केली आहे. 

अटक आरोपींची साखळी
अयान अहमद तनवीर अहमद (१९) : मुख्य आरोपी (अत्याचार करणारा).
उजेरखान इकबाल खान (२०) : व्हिडिओ डाऊनलोड करून प्रसारित करणारा.
मोहम्मद साद मोहम्मद साबीर (२२) : व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ शेअर करणारा.
तरबेज खान तसलिम खान (२४) : व्हिडिओ प्रसारात सक्रिय सहभाग.
चौकशीसाठी सहा जण ताब्यात.

Web Title : अमरावती वीडियो कांड: दोस्त के कमरे पर दो लड़कियों का यौन उत्पीड़न।

Web Summary : अमरावती में, एक चौंकाने वाले वीडियो कांड में दो लड़कियों के यौन उत्पीड़न का खुलासा हुआ। मुख्य आरोपी अयान अहमद ने अपराध के लिए एक दोस्त के कमरे का उपयोग करने की बात कबूल की। पुलिस दोस्त की जांच कर रही है। वीडियो और तस्वीरें वायरल होने पर 45 सदस्यीय एसआईटी का गठन किया गया।

Web Title : Amravati Video Scandal: Two girls sexually assaulted at friend's room.

Web Summary : In Amravati, a shocking video scandal reveals two girls were sexually assaulted. The main accused, Ayan Ahmed, confessed to using a friend's room for the crime. Police are investigating the friend. 45-member SIT formed as videos and photos went viral.