तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 06:36 IST2026-04-16T06:36:17+5:302026-04-16T06:36:34+5:30

Firing: तुर्कस्थानमधील एका माध्यमिक शाळेत बुधवारी विद्यार्थ्याने दोन वर्गांमध्ये बुधवारी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ९ जण ठार व २० जण जखमी झाले. त्या देशात गेल्या दोन दिवसांत घडलेली ही अशा प्रकारची दुसरी घटना आहे.

Student shoots dead 9 people at school in Turkey | तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार

तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार

अंकारा - तुर्कस्थानमधील एका माध्यमिक शाळेत बुधवारी विद्यार्थ्याने दोन वर्गांमध्ये बुधवारी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ९ जण ठार व २० जण जखमी झाले. त्या देशात गेल्या दोन दिवसांत घडलेली ही अशा प्रकारची दुसरी घटना आहे.

गोळीबार करणारा विद्यार्थी स्वतःही ठार झाला. त्याचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी असून त्यांचे पिस्तुल घेऊन तो शाळेत आला होता असे काहरामनमरसम प्रांतातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या विद्यार्थ्याकडे आणखी काही शस्त्रेही होती. त्याने केलेल्या गोळीबारात ठार झालेल्यांमध्ये एक शिक्षक आणि आठ विद्यार्थी यांचा समावेश आहे. जखमींपैकी किमान चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

Web Title : तुर्की में स्कूली छात्र ने की गोलीबारी, 9 की मौत

Web Summary : तुर्की के एक माध्यमिक विद्यालय में एक छात्र ने अंधाधुंध गोलीबारी की, जिसमें एक शिक्षक और आठ छात्रों सहित नौ लोगों की मौत हो गई। हमलावर, एक सेवानिवृत्त पुलिस अधिकारी का बेटा था और उसने अपने पिता की पिस्तौल का इस्तेमाल किया। हमले में बीस लोग घायल हुए हैं, जिनमें से कुछ की हालत गंभीर है। कारण अज्ञात है।

Web Title : Turkey School Shooting: Student Kills 9 in Classroom Rampage

Web Summary : A student in Turkey fatally shot nine people, including a teacher and eight students, at a secondary school. The shooter, son of a retired police officer, used his father's pistol. Twenty others were injured, some critically, in the deadly classroom attack. The motive remains unclear.