शहरं
Join us  
Trending Stories
1
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
2
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
3
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
4
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
5
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
6
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
7
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
8
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
9
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
10
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
11
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
12
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
13
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
14
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
15
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
16
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
17
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
18
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
19
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
20
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील लग्न सोहळ्याला तब्बल ६०० पाहुण्यांची उपस्थिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:36 IST

कोरोना नियमांचे उल्लंघन : वधू-वर पित्यांसह अन्य दोघांवर गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न सोहळ्याला ५० पेक्षा अधिक पाहुण्यांना परवानगी नसली तरी, पश्चिमेकडील मल्हारनगरमधील नवजीवन विद्यामंदिरच्या पटांगणात शनिवारी पार पडलेल्या एका लग्न साेहळ्यास तब्बल ५०० ते ६०० पाहुण्यांनी उपस्थिती लावली होती. कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक वर-वधू पित्यांसह शाळेचे पटांगण लग्नासाठी देणाऱ्या मुख्याध्यापकावर येथील महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पश्चिमेकडील संतोषीमाता रोड परिसरात राहणारे सुभाष गोरे यांच्या दोन मुलींचा लग्न सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. दोघींचे वर हे टिटवाळा आणि कल्याण येथील राहणारे आहेत. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक दत्तात्रेय देसाई आणि पोलीस हवालदार सी.वाय. चव्हाण हे दोघे गस्त घालत असताना त्यांना लग्न सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी निदर्शनास आली. 

मोकळ्या जागा, लॉन्स, विनावातानुकूलित हॉल याठिकाणी ५० व्यक्तींनाच हजर राहता येईल, असा नियम असताना त्याठिकाणी ६०० च्या आसपास पाहुणे आढळून आले. विशेष बाब म्हणजे लग्न सोहळ्यासाठी पोलीस परवानगीदेखील घेतली नसल्याचे चौकशीत समोर आले. अखेर, लग्नाचे आयोजन करणारे वधूचे पिता सुभाष गोरे, वराचे पिता पंडित धुमाळ, अन्य एका वराचा भाऊ प्रीतेश म्हात्रे यांच्यासह नवजीवन शाळेचे मुख्याध्यापक आर.टी. पाटील अशा चौघांवर पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन आणि साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.

अंगारकीला गणपती मंदिर राहणार बंदटिटवाळा : काेराेनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी टाळण्यासाठी कार्यक्रम घेणे टाळण्याचे आवाहन केले हाेते. त्या दृष्टीने प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर अंगारकी संकष्ट चतुर्थीला दरवेळी टिटवाळा येथील गणेश मंदिरात हाेणारी गर्दी लक्षात घेताना मंगळवारी २ मार्चला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर सोमवारी रात्री १२ वाजल्यापासून ते मंगळवारपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती टिटवाळा श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या