गल्ली-बोळांमध्ये दिसणाऱ्या स्कूल बसचा रंग गुलाबी, लाल, हिरवा का नसतो, पिवळाच का असतो? पाहा कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:32 IST2026-05-14T11:22:59+5:302026-05-14T11:32:32+5:30

School Bus Color Facts : तुम्ही कधी विचार केला आहे का, शाळेच्या बसचा रंग नेहमी पिवळाच का असतो? चला तर मग जाणून घेऊया यामागचं खास कारण.

Why school bus colour is yellow always know the real reason | गल्ली-बोळांमध्ये दिसणाऱ्या स्कूल बसचा रंग गुलाबी, लाल, हिरवा का नसतो, पिवळाच का असतो? पाहा कारण

गल्ली-बोळांमध्ये दिसणाऱ्या स्कूल बसचा रंग गुलाबी, लाल, हिरवा का नसतो, पिवळाच का असतो? पाहा कारण

School Bus Color Facts : आपल्या गल्लीत किंवा परिसरात किंवा कुठे बा़हेर गेले असाल तेव्हा रोज सकाळी येणाऱ्या शाळेच्या बस आपण सगळ्यांनीच पाहिल्या असतील. या बस मुलांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करून खास डिझाइन केलेल्या असतात. वेगवेगळ्या शाळांच्या बसमध्ये नाव, आकार किंवा कंपनीचा फरक दिसू शकतो, पण एक गोष्ट मात्र प्रत्येक बसमध्ये समान असते ती म्हणजे तिचा पिवळा रंग. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, शाळेच्या बसचा रंग नेहमी पिवळाच का असतो? चला तर मग जाणून घेऊया यामागचं खास कारण.

शाळेच्या बससाठी ठरलेले नियम

शाळेच्या बससाठी अनेक गाइडलाईन निश्चित करण्यात आलेल्या आहेत. बसमध्ये सीट बेल्ट, मोठ्या आणि स्पष्ट दिसणाऱ्या खिडक्या, तसेच मुलांना आरामदायी बसण्याची व्यवस्था असणं आवश्यक मानलं जातं. याशिवाय, बसचं डिझाइन आणि सस्पेन्शन सिस्टम अशी असते की मुलांना प्रवासादरम्यान आरामदायी वाटावे. मात्र या सर्व गोष्टींसोबतच बसचा रंग पिवळा असणे हेही महत्त्वाचं मानलं जातं.

पहिली पिवळी बस कधी सुरू झाली?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या माहितीनुसार, शाळेच्या बसना पिवळा रंग देण्याची परंपरा अमेरिकेत 1939 पासून सुरू झाली. एका भारतीय वाहन उत्पादक कंपनीच्या दाव्यानुसार, डॉ. फ्रँक सायर यांना पिवळ्या शाळा बसचे जनक मानलं जातं. त्यांनी शिक्षणतज्ज्ञ आणि वाहतूक तज्ज्ञांची एक परिषद आयोजित केली होती. या परिषदेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीवर चर्चा झाली आणि शाळेच्या बससाठी अधिकृत रंग म्हणून पिवळ्या रंगाची निवड करण्यात आली.

शाळेच्या बसचा रंग पिवळाच का असतो?

पिवळा रंग मानवी डोळ्यांना सर्वात पटकन आणि स्पष्ट दिसणाऱ्या रंगांपैकी एक मानला जातो. अनेक संशोधनांमध्ये असे दिसून आले आहे की, इतर रंगांच्या तुलनेत पिवळा रंग अधिक सहज लक्ष वेधून घेतो. खासकरून सकाळी आणि संध्याकाळी, जेव्हा प्रकाश कमी असतो आणि मुले शाळेत ये-जा करत असतात, तेव्हा हा रंग दूरवरूनही स्पष्ट दिसतो.

याशिवाय, वाहतूक सिग्नलमध्येही पिवळा रंग सावधगिरीचा संकेत देतो. त्यामुळे चालकांना आपोआप स्पीड कमी करण्याचा इशारा मिळतो. शाळेच्या बसभोवती मुले असण्याची शक्यता असल्याने चालकांनी अधिक काळजीपूर्वक वाहन चालवावं, हा संदेशही पिवळा रंग प्रभावीपणे देतो. म्हणूनच सुरक्षितता आणि जागरूकतेचे प्रतीक असलेला पिवळा रंग शाळेच्या बससाठी सर्वोत्तम मानला जातो.

Web Title : स्कूल बसें गुलाबी, लाल या हरी क्यों नहीं, पीली क्यों होती हैं?

Web Summary : स्कूल बसें पीली इसलिए होती हैं क्योंकि पीला रंग आसानी से दिखता है। अमेरिका में 1939 में इसकी शुरुआत हुई। यह कम रोशनी में भी स्पष्ट दिखता है, जिससे स्कूलों के पास सुरक्षा बढ़ती है और चालकों को सावधानी बरतने का संकेत मिलता है।

Web Title : Why school buses are yellow, not pink, red, or green?

Web Summary : School buses are yellow for visibility, originating in 1939 in America. Yellow is easily seen, especially in low light, enhancing safety near schools. It alerts drivers to slow down, protecting children.