Interesting Facts : आपण पाहिलं असेल की, वेगवेगळे मॉल्स किंवा मोठ्या हॉटेल्समध्ये स्वच्छतेसाठी कितीतरी गोष्टी केलेल्या असतात. हॉटेल्समधील टॉयलेट किंवा वॉशरूम फारच चकाचक असतात. पण आपल्याला कदाचित माहीत नसेल की, बऱ्याच हॉटेल्समधील टॉयलेट किंवा वॉशरूमच्या यूरिनल्समध्ये बर्फाचे तुकडे टाकलेले असतात. पण यूरिनल्समध्ये हे बर्फाचे तुकडे का टाकतात? असा प्रश्न आपल्याला पडला असेलच. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. ghummakadpandit नावाच्या हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. ज्यात विचारण्यात आलंय की, ५ स्टार हॉटेलच्या यूरिनल्समध्ये बर्फाचे तुकडे का टाकले जातात? महत्वाची बाब म्हणजे या व्हिडिओच्या कमेंट्समध्येच या प्रश्नाचं उत्तर अनेकांनी दिलंय. एका यूजरने लिहिलं की, 'बर्फाचे तुकडे टॉयलेटमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यानी दुर्गंधी वाढवणारे बॅक्टेरिया कमी होतात आणि यामुळे लघवीची दुर्गंधी नियंत्रित होते. अशात टॉयलेटमध्ये दुर्गंधी वाढत नाही'. दुसऱ्याने लिहिलं की, 'बर्फाच्या तुकड्यांनी यूरिनल्सची दुर्गंधी कमी होते'.
रोज ३ ते ४ किलो बर्फाचा वापर
इन्स्टावरच urimatschweiz नावाच्या हँडलवर पोस्ट करण्यात आलेल्या एका दुसऱ्या व्हिडिओत सांगण्यात आलंय की, बर्फाचे तुकडे टॉयलेटमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी वापरले जातात. जसा-जसा बर्फ वितळतो, दुर्गंधी वाढवणारे बॅक्टेरिया त्यासोबत बाहेर पडतात. हा उपाय चांगला वाटू शकतो, पण ऊर्जा आणि संसाधनांच्या दृष्टीने पाहिलं तर हा उपाय फार खर्चीक आणि वेळ घालवणारा आहे. रोज साधारण ३ ते ४ किलो बर्फाचे तुकडे लागतात. इतका बर्फ तयार होण्यासाठी ०.३-०.८ किलो व्हॅट-तास ऊर्जेची गरज पडते.
आता यानंतर जेव्हा आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये जाल आणि आपल्याला मेल टॉयलेटमध्ये बर्फाचे तुकडे दिसले तर समजून घ्या ते कशासाठी आहेत.
Web Summary : Luxury hotels often place ice in urinals to combat odors by reducing bacteria. While effective, this method is energy-intensive, requiring significant electricity to produce the ice. It's a costly approach to maintain restroom freshness.
Web Summary : लग्जरी होटल मूत्रालयों में बर्फ इसलिए डालते हैं ताकि बैक्टीरिया कम करके दुर्गंध से मुकाबला किया जा सके। प्रभावी होने के बावजूद, यह तरीका ऊर्जा गहन है, जिसके लिए बर्फ बनाने में भारी बिजली की खपत होती है। यह शौचालय की ताजगी बनाए रखने का एक महंगा तरीका है।