एस्केलेटरच्या कोपऱ्यावर ब्रश का लावलेले असतात? पाहिले तर असतील, पण माहीत नसेल कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 16:23 IST2026-04-22T16:23:03+5:302026-04-22T16:23:51+5:30
Interesting Facts : आज आम्ही आपल्याला अशाच एका गोष्टीबाबत सांगणार आहोत, जी आपण पाहिली तर अनेकदा असेल, पण त्याचं नेमकं कारण आपल्याला माहीत नसेल.

एस्केलेटरच्या कोपऱ्यावर ब्रश का लावलेले असतात? पाहिले तर असतील, पण माहीत नसेल कारण...
Interesting Facts : आपण रोज सकाळपासून ते रात्र होईपर्यंत अनेक गोष्टी बघत असतो. या गोष्टी बघून आपण आपलं काम सुरू ठेवतो. जेव्हा आपल्याकडे रिकामा वेळ असतो, तेव्हा आपल्याला अनेक गोष्टींबाबत प्रश्न पडतात. म्हणजे एखादी वस्तू अशी का आहे किंवा त्याचं कारण काय असेल? प्रश्न पडतात पण फार कमी लोक असे असतात जे एखादी गोष्ट दिसली तर त्याबाबत माहिती काढून वाचतात. अनेकांना एखाद्या गोष्टीचं कारण माहीत नसतं. आज आम्ही आपल्याला अशाच एका गोष्टीबाबत सांगणार आहोत, जी आपण पाहिली तर अनेकदा असेल, पण त्याचं नेमकं कारण आपल्याला माहीत नसेल.
एस्केलेटर पाहिलं असेलच...
वेगवेगळे मॉल, रेल्वे स्टेशन, एअरपोर्टवर आपण एस्केलेटर कधीना कधी वापरलं असेलच. जेव्हा आपण एस्केलेटरचा वापर केला असेल, तेव्हा पाहिलं असेल की, दोन्ही बाजूच्या कोपऱ्यांवर ब्रश लावलेले असतात. या ब्रशच्या मदतीने अनेकदा लोक आपला शूज साफ करताना दिसतात. पण हे ब्रश नेमके कशासाठी असतात? असा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? नक्कीच हे ब्रश शूज साफ करण्यासाठी नसतात. त्यांचं मुख्य काम वेगळंच असतं. जे आज आपण जाणून घेणार आहोत.
कशासाठी असतात ब्रश?
एस्केलेटरच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेल्या ब्रशला सामान्यपणे स्कर्ट डिफ्लेक्टर किंवा स्कर्ट ब्रश असं म्हणतात. हे ब्रश सुरक्षेच्या कारणासाठी तिथे लावलेले असतात. या ब्रशचं काम शूजची लेस, कपडे जसे की, धोतर, साडी, ओढणी किंवा इतर वस्तू पायऱ्यांवरील गॅपमध्ये जाण्यापासून रोखणं हे असतं. तसेच नाणी किंवा चावी एस्केलेटरच्या गिअरमध्ये अडकण्यापासून हेच ब्रश रोखतात.