Porn star bridget the midget faces 15 years in jail for stabbing ex boyfriend | प्रसिद्ध पॉर्न स्टारला १५ वर्षांची शिक्षा, तिचा कारनामा वाचून व्हाल अवाक्....
प्रसिद्ध पॉर्न स्टारला १५ वर्षांची शिक्षा, तिचा कारनामा वाचून व्हाल अवाक्....

प्रसिद्ध पॉर्न स्टार Bridget The Midget ला पोलिसांनी अटक केली आहे. इतकेच नाही तर तिला आता १५ वर्ष तुरूंगवास भोगावा लागणार आहे. Bridget चं खरं नाव शेरिल मर्फी असं आहे. तिच्यावर आरोप आहे की,  तिने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डच्या घरात घुसून तोडफोड केली आणि त्याला चोकूने भोसकण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी शेरिलला गेल्या महिन्यात लास वेगासमधून अटक केली. असे सांगितले जात होते की, तिचा एक्स बॉयफ्रेन्ड दुसऱ्या महिलेसोबत होता, ज्याचा शेरिलला राग आला आणि तिने हा गोंधळ घातला. शेरिल ही तिच्या ठेंगणेपणामुळे पॉर्न इंडस्ट्रीमध्ये फेमस होती. तसेच ती २००३ मध्ये 'SWAT' या हॉलिवूड सिनेमातही दिसली होती.

'द सन' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी शेरिफवर घातक हत्यार घेऊन घरात घुसण्याचा, तोडफोड करण्याचा आणि अपराधाची भावना ठेवण्याचा गुन्हा दाखल केलाय. आता तिला २ ते १५ वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.

शेरिलच्या बॉयफ्रेन्डचं नाव जेसी जेम्स आहे. त्याच्यासोबत त्यावेळी जी महिला होती, तिने पोलिसांना माहिती दिली. महिलेने सांगितले की, जेव्हा शेरिल आली तेव्हा ती आणि जेसी बेडरूममध्ये होते. तिने जोरजोरात दरवाजा वाजवला आणि जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. महिलेचा आरोप आहे की, शेरिलने जेम्सवर चाकू मारल्यानंतर तिच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

जेम्सने सांगितले की, ज्यावेळी त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा तो झोपलेला होता. जेम्सच्या शेजाऱ्यांनी गोंधळाचा आवाज ऐकला आणि पोलिसांना माहिती दिली. शेरिल मर्फीने १९९९ मध्ये पॉर्न इंडस्ट्रीत पहिलं पाऊल ठेवलं होतं. आतापर्यंत तिने ५० पॉर्न सिनेमात काम केलं आहे.

 Web Title: Porn star bridget the midget faces 15 years in jail for stabbing ex boyfriend
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.