शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

माणुसकीला सलाम! आई वडिलांना कोरोना संसर्ग; महिला पोलिसानं ६ महिन्यांच्या बाळाचा केला सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 12:48 PM

Coronavirus : बाळाच्या आई-वडिलांना झाली होती कोरोनाची लागण. महिला पोलीस कर्मचाऱ्यानं बाळाला सुखरूप पोहोचवली आजीआजोबांपर्यंत.

ठळक मुद्देबाळाच्या आई-वडिलांना झाली होती कोरोनाची लागण.महिला पोलीस कर्मचाऱ्यानं बाळाला सुखरूप पोहोचवली आजीआजोबांपर्यंत.

भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अनेकांना आपल्या कुटुंबीयांपासून दूरही केल्याचं आपण पाहिलं आहे. दररोज आपल्याला अशा कोणत्या ना कोणत्या घटना ऐकायला मिळतात. या काळात काही चांगल्याही गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. अशातच दिल्लीतून सर्वांच्या मनात घर करून जाणारी एक माहिती समोर आली आहे. दिल्लीत राहणाऱ्या एका दांपत्याला कोरोनाची लागण झाली. त्यांचं एक सहा महिन्यांचं बाळही होतं. परंतु त्या बाळाची काळजी घेणारं कोणीही नव्हतं. अशा परिस्थितीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्यानं पुढाकार घेत त्या बाळाची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत राहणाऱ्या या दांपत्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. परंतु त्या बाळाचा अहवाला नकारात्मक आला. इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार त्यांनी यानंतर दिल्ली पोलिसांना फोन केला आणि मदती करण्याची विनंती केली. दिल्लीत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आपले नातेवाईक येऊ शकत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांना आपल्या बाळाला कोरोनाची लागण होऊ नये याची चिंता होती. शाहदरा जिल्ह्यात तैनात असलेलय्या महिला हेड कॉन्स्टेबल राखी यांना याबाबत माहिती मिळाली. यानंतर त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी त्या दांपत्याशी संपर्क केला आणि बाळाला आपल्यासोबत घेऊन आल्या. पोलीस कर्मचारी राखी यांनी बाळाचे कपडे, खाणं आणि अन्य आवश्यक वस्तू आपल्यासोबत घेतल्या. तसंच त्यांनी त्या बाळाची काळजीही घेतली. त्यांनी त्या बाळाला अगदी आईप्रमाणे खाऊ-पिऊही दिलं. त्यानंतर त्या बाळाला सुरक्षितपणे आजीआजोबांकडे मोदीनगर या ठिकाणी पोहोचवलं. या संपूर्ण प्रवासात राखी यांनी त्या बाळाची अगदी आईप्रमाणे काळजी घेतली. या महिला पोलीस कर्मचाऱ्याला एक सलाम.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत